वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोदी मुलांमध्ये रमले. विशेष म्हणजे कार्यक्रमात सहभागी झाल्याने मला ५० वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटले, असे त्यांनी सांगितले. जीवनात यशस्वी होण्याच्या काही अनमोल टिप्स त्यांनी दिल्या. Develop quality in yourself to experience happiness in life: Prime Minister Narendra Modi
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, परीक्षेवरील चर्चा कार्यक्रमाचा तुम्हाला किती फायदा होतो हे मला माहीत नाही, पण मला याचा खूप फायदा झाला आहे. तुमच्यामध्ये येऊन मी ५० वर्षांनी लहान झालो आहे.
मी तुमच्यापासून काहीतरी शिकून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. मला तुमच्या आकांक्षा समजतात. म्हणूनच हा कार्यक्रम माझ्यासाठी फारच फायदेशीर आहे. यातून माझी ताकद वाढवण्याचे काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर तुम्हाला जीवनातील आनंद अनुभवायचा असेल तर तुम्ही स्वत:मध्ये गुणवत्ता विकसित केली पाहिजे.
म्हणजेच सद्गुणांचे पुजारी बनणे. कोणामध्ये चांगले गुण दिसले तर ते आत्मसात करा. इर्षा व मत्सर वाढू देऊ नका. इतरांच्या शक्ती जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आपण विकसित केली. तसेच ती वैशिष्ट्ये आपल्यात आणण्याची क्षमता आपोआप विकसित होईल. जो सक्षम आहे त्याला आयुष्यात संधी मिळते. त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.
Develop quality in yourself to experience happiness in life: Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात आगीच्या दोन किरकोळ दुर्घटना
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीला मोठा दिलासा, कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली
- कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स
- लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…