• Download App
    नियतीने साधला वेगळाच योग; दोन महान आत्म्यांचे एकाच दिवशी गमनDestiny : the two great souls depart on the same day, Hiraben Modi and Pele

    नियतीने साधला वेगळाच योग; दोन महान आत्म्यांचे एकाच दिवशी गमन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिराबा मोदी आणि पेले वास्तविक परस्पर काहीही संबंध नाही, पण नियतीने असा काही वेगळा योग साधला, की या दोन महान आत्म्यांनी या धरतीवरून एकाच दिवशी गमन केले. धुळीतून शिखराकडे जाताना एक आपल्या कर्तृत्वाने एक स्वतः महान बनले आणि दुसरीने एका महान आत्म्याला जन्म दिला. Destiny : the two great souls depart on the same day, Hiraben Modi and Pele

    एकाने पायांच्या करामतीने सगळे जग जिंकले, तर दुसऱ्या महान आत्म्याने अशा दुसऱ्या महान आत्म्याला जन्म दिला की ज्याने आपल्या कर्तृत्वाने सगळ्या जगाला आपलेसे केले. भारताला जगाच्या नेतृत्वपदी बसविले.

    हिराबा मोदी आणि पेले हे एकमेकांना ओळखले असण्याची शक्यताच नाही. पेलेंना कदाचित मोदींची आई म्हणून हिराबा माहिती असतील – नसतील. पण हिराबा यांना पेले माहिती असण्याची सुताराम शक्यता नाही. पण तरी देखील या दोन महान आत्म्यांचे पृथ्वीवरून गमन एकाच दिवशी समस्त पृथ्वीवासीयांना दुःखात लोटणारे ठरले आहे, पण त्याच वेळी संपूर्ण जगताला प्रेरणादायी ठरले आहे.


    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल; लवकर बरे होण्याच्या राहुल गांधींच्या शुभेच्छा


    फुटबॉलचा विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक फुटबॉलपटूचे स्वप्न. पण हे स्वप्न साकार करण्याची क्षमता फार थोड्यांकडे. त्यातही हे स्वप्न तीनदा साकार करणे हे सर्वात अवघड, किंबहुना अशक्य…, पण ही अशक्यप्राय गोष्ट आपल्या कर्तृत्वाने पेले यांनी ब्राझीलसाठी करून दाखवली होती आणि ते जगातल्या फुटबॉल प्रेमींचे दैवत बनले होते. आज या दैवताचेच पृथ्वीवरून गमन झाले आहे.

    हिराबा मोदी तशा सार्वजनिक जीवनात फार कमी वेळा सहभागी झाल्या, हे दस्तूर खुद्द मोदींनीच आपल्या ब्लॉगमध्ये 18 जून 2022 ला लिहिले होते. काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून आल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हिराबा यांनी मोदींच्या औक्षण केले होते. गुजरातचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सार्वजनिक व्यासपीठावर दिसल्या होत्या. पण त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत. एका कार्यक्रमाला त्यांना मोदी घेऊन जायचे म्हणत होते, तेव्हा त्यांनी मोदींच्या शिक्षकांना घेऊन जायला सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, मी सामान्य व्यक्ती आहे. मी जरी तुला जन्म दिला असला तरी तुला सर्व शक्तिमान परमेश्वराने वाढवले आहे आणि शिक्षकांनी तुला घडविले आहे. त्यांना विसरू नकोस. जेठाभाई जोशी यांनी मोदींना वर्णमाला शिकवली होती, त्यांच्या घरातला घरातल्या व्यक्तींना निमंत्रण देण्यासाठी हिराबा आग्रही होत्या, याची आठवण स्वतः मोदींनी ब्लॉग मध्ये लिहिली आहे.

    अशा या दोन महान आत्म्यांचा, ज्यांचा परस्परांशी कधीही संबंध आला नाही, त्या दोन महान आत्म्यांचे पृथ्वीवरून एकाच वेळी गमन होणे हा विलक्षण योगायोग नियतीने साधला आहे!!

    Destiny : the two great souls depart on the same day, Hiraben Modi and Pele

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!