वृत्तसंस्था
पणजी : गोव्यातील निवडणुकीत शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला तोंड दाखवायला जागा उरली नाही.Deposits of ten Shiv Sena and rashtrvadi candidates confiscated in Goa, less votes than ‘NOTA’
भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीशी आघाडी करून मत विभाजन करून भाजपचे उमेदवार पडण्याचा डाव रचला. पण उमेदवार केवळ पडलेच नाहीतर त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याने त्यांच्याच अंगाशी आला आहे. दोन्ही पक्षांच्याउमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. एकप्रकारे गोवेकरांनी त्यांना थाराही दिला नाही.
गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठी तयारी केली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी निवडणूक प्रचार काळात तेथे तळ ठोकला होता. आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रचारही केला होता, पण त्यांना गोवेकरांनी साथ दिली नाही, हे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेने गोव्यात दहा ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही तसेच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होत आहे.
डिपॉझिट का रद्द झाले
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराला एकूण मतांच्या १६.६ टक्के पडणे आवश्यक आहे.मात्र २०१७ प्रमाणे शिवसेनेच्या पदरात निराशा पडली आहे. शिवसेनेला गोव्यात केवळ ०.२ टक्के मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही केवळ १ टक्का मते मिळाली आहेत.
दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला १.१३ टक्के मते मिळाली आहे. ही आकडेवारी पहिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटाला मिळालेल्या आकडेवारीपेक्षा कमी असून त्यांचा दारुण पराभव असल्याचे दर्शवतो.
नोटा म्हणजे काय ?
मतदान यंत्रावर उमेदवारांचे नाव आणि त्यासमोर चिन्ह आणि मतदान करण्याचे बटण असते. अनेक मतदारांना वरील कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही अर्थात None of the above (नोटा)चा ऑप्शन दिलेला असतो. त्यासमोरील बटण दाबून त्यावर मतदान करता येते. असे मतदान केलेली गोव्यातील आकडेवारी पाहता ती १.१३ टक्के एवढी आहे.पण, त्यापेक्षा कमी मते शिवसेना आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे ०.२ टक्के आणि १ टक्के एवढी आहेत.
Deposits of ten Shiv Sena and rashtrvadi candidates confiscated in Goa, less votes than ‘NOTA’
- UP ELECTION RESULT LIVE : भगवाधारी ..शेतकरी आंदोलन, महागाई-बेरोजगारी सर्वांवर भारी ! ना प्रियंका गांधींचे ‘नाक’ ना मायावतींची ‘जात’ सगळेच सुपर फ्लॉप…फक्त मोदी- योगिराज…
- निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात ; सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब
- आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक सुरू
- घरफाेडी गुन्हेगारांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त