• Download App
    जन धन बँक खात्यांमधील ठेवींनी ओलांडला दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा Deposits in bank accounts opened under the Jan Dhan scheme, launched about seven and half years ago by the government, have crossed the Rs 1.5 lakh crore mark

    जन धन बँक खात्यांमधील ठेवींनी ओलांडला दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुमारे साडेसात वर्षांपूर्वी जन धन योजना सुरु केली होती. त्या अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमधील ठेवींनी आता दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. Deposits in bank accounts opened under the Jan Dhan scheme, launched about seven and half years ago by the government, have crossed the Rs 1.5 lakh crore mark

    केंद्रीय मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार प्रधानमंत्री जन धन योजनेत(PMJDY) ४४.२३ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या
    खात्यांमधील एकूण शिल्लक डिसेंबर २०२१ अखेर १, ५०,९३९.३६ कोटी रुपये होती.

    प्रधानमंत्री जन धन योजनेत आर्थिक समावेशासाठी राष्ट्रीय मिशनने गेल्या वर्षी ऑगस्टम अंमलबजावणीची सात वर्षे पूर्ण केली होती. १५ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली होती.

    अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण ४४.२३ कोटी खात्यांपैकी ३४.९ कोटी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, ८.५ कोटी प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये आणि उर्वरित १.२८ कोटी खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत.

    तसेच, ३१.२८ कोटी लाभार्थ्यांना रूपे डेबिट कार्ड देण्यात आले. विशेष म्हणजे रुपे कार्डची संख्या आणि त्यांचा वापर कालांतराने मोठा वाढला आहे.
    आकडेवारीनुसार, २९.५४ कोटी जन धन खाती ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये होती. २९ डिसेंबर २०२१ पर्यंत जवळपास २४.६१ कोटी खातेदार महिला होत्या.

    योजनेच्या पहिल्या वर्षात १७.९० कोटी खाती उघडण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जन धन खात्यांसह मूलभूत बचत बँक ठेव (BSBD) खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच सामान्य माणूसही आपले खाते बँकेत असल्याचे अभिमानाने सांगू शकला. तसेच सरकारच्या अर्थविषयक योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरला आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती, सबसिडी, पेन्शन आणि कोविड रिलीफ फंड यांसारखे फायदे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जन धन खात्यांसह बँक खात्यांमध्ये जमा केले जातात. त्याचा खातेदारांना मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले.

    Deposits in bank accounts opened under the Jan Dhan scheme, launched about seven and half years ago by the government, have crossed the Rs 1.5 lakh crore mark

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य