• Download App
    हिंदू राष्ट्राची मागणी करणे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करणे नव्हे, जंतरमंतरवरील आंदोलनातील आंदोलकांचा युक्तीवाद|Demanding Hindu Rashtra is not to create a religious rift, it is the argument of the agitators in the Jantar Mantar movement

    हिंदू राष्ट्राची मागणी करणे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करणे नव्हे, जंतरमंतरवरील आंदोलनातील आंदोलकांचा युक्तीवाद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिंदू राष्ट्राची मागणी करणे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करणे नाही, असे जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांनी म्हटले आहे. याठिकाणी मुस्लिमविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.Demanding Hindu Rashtra is not to create a religious rift, it is the argument of the agitators in the Jantar Mantar movement

    जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनातील एक आरोपी प्रीत सिंग यांनी न्यायालयात जामीनअर्ज सादर केला आहे. त्यांचे वकील विष्णु शंकर जैन म्हणाले, मी जबाबदारीच्या भावनेतून हा अर्ज करत आहे. जर महिलांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणे कलम १५३ अ च्या कक्षेत येत असेल तर मी हा जामीन अर्ज मागे घेईल.जैन म्हणाले, लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे गैर नाही.



    न्यायमूर्ती गुप्ता यांनी जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवताना जैन यांना फटकारले आहे. भाषण देण्यासाठीचे हे व्यासपीठ नाही. तुम्ही एकच गोष्ट चार-पाच वेळा सांगू शकत नाही. याबाबतचा न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय दाखवा. तुम्ही एका वाक्यात सांगितले काय आणि भलेमोठे भाषण दिले काय शेवटी तथ्य तेच राहणार आहे. त्यामुळे वकीलाप्रमाणे न्यायालयात युक्तीवाद करा.

    २७ ऑगस्ट रोजी कनिष्ठ न्यायालयात झालेल्या सुनावणीत सिंग यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यांनी केवळ कार्यक्रमाचे आयोजन केले नाही तर त्यामध्ये सक्रीय सहभागही घेतला. या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या भडकाऊ भाषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

    जैन यांनी उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, सिंह यांच्यावर कलम 153 ए वगळता आरोप केलेले सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यांचे कोणतेही विधान अजामीनपात्र गुन्ह्यांच्या तरतुदीच्या कक्षेत येणार नाही. आंदोलनात भडकाऊ घोषणा दिल्या जाऊ लागल्यावर ते तेथून निघून गेले होते. याचे कारण म्हणजे भारताच्या एकात्मतेसाठीचे हे आंदोलन होते आणि त्यामध्ये समान नागरी कायद्याची मागणी केली होती.

    अतिरिक्त सरकारी वकील तरंग श्रीवास्तव यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींना आयपीसी कलम 34 (अनेक लोकांनी सामान्य हेतूने केलेले कृत्य) अंतर्गत समाविष्ट केले आहे. सिंग आणि सहआरोपी पिंकी चौधरी यांचा एक व्हिडीओही उपलब्ध आहे. त्यामध्ये ते भडकाऊ भाषेत बोलत आहेत. ते फक्त हिंदु राष्ट्र निर्मितीची मागणी करत नाहीत तर इतर धर्माच्या लोकांनी देशाबाहेर जावे असेही म्हणत आहेत.

    Demanding Hindu Rashtra is not to create a religious rift, it is the argument of the agitators in the Jantar Mantar movement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

    Kulbhushan Jadhav : कुलभूषण पाकिस्तानातील हायकोर्टात करू शकणार नाहीत अपील; फक्त कॉन्सुलर सहाय्य प्रदान केले