जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार
डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता .
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाविरोधात (Covid-19)लढत आहे. जगावर असलेले कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी सगळीकडे लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आता डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हण्टले आहे. Delta variant: Delta variant more dangerous if vaccination is not accelerated: WHO warns
जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरिएटचा जास्त प्रसार होण्याच्या आधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन देखील जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे. येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
Delta variant: Delta variant more dangerous if vaccination is not accelerated: WHO warns
महत्त्वाच्या बातम्या
- देशात तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती, कोरोना रुग्णसंख्या वाढतेय ; ईशान्य भारतात परिस्थिती बिकट
- Tokyo Olympics : अतनु दासपाठोपाठ बॉक्सर अमित पंघालही बाहेर ; कमलप्रीत कौर फायनलमध्ये
- बॉक्सर पूजा वडिलांना केला फोन म्हणाली ,”पप्पा तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
- तामिळनाडू महिला आयपीएस बलात्कार प्रकरणात डीजीपी त्रिपाठी यांच्याविरुद्ध 400 पानांचे आरोपपत्र दाखल..
- आसाम सरकार दावा : मिझोरमचे लोक आसामच्या नागरिकांना धमकावत आहेत