• Download App
    शेतकरी आंदोलकांनी व्यापलेला दिल्ली-मेरठ महामार्ग मोकळा करण्यासाठी पत्र । Delhi – Merat High way will clear fastly

    शेतकरी आंदोलकांनी व्यापलेला दिल्ली-मेरठ महामार्ग मोकळा करण्यासाठी पत्र

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली-मेरठ या महामार्गाची दिल्लीच्या सीमेवरील भागाची अवस्था गेल्या १० महिन्यांत वाईट झाली आहे. या टप्प्यातील दुरूस्ती त्वरित न केल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळे त्याच्या दुरूस्तीसाठी हा मार्ग मोकळा करावा,’ असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेले १० महिने दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. Delhi – Merat High way will clear fastly



    हरियानातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर धडक दिली. गेले १० महिने हे आंदोलन सुरू असल्याने गाझीपूर येथे एक नवे गावच वसल्याचे चित्र दिसत आहे. दिल्ली- मेरठ महामार्गावरच गाझीपूर टप्प्यात अनेक तंबू व नवीन तात्पुरती बांधकामेही झाली आहे. राकेश टिकैत यांनी मध्यंतरी येथे फुलझाडे लावण्याचा प्रयोगही केला होता. रस्त्यावरच जंगली झुडपे उगवली आहेत, खड्यांचे साम्राज्य झाले आहे. येथील पथदिवे बंद आहेत, कारण त्यांची वीज शेतकऱ्यांनी आपल्या वातानुकूलीत यंत्रांसाठी वापरण्यास सुरवात केली आहे.

    Delhi – Merat High way will clear fastly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी