• Download App
    दिल्ली दारू घोटाळा : मनीष सिसोदियांची अटक हे तर हिमनगाचे टोक, गोवा, तेलंगण तामिळनाडूत अजून बरेच अटकेच्या रांगेत!! Delhi liquor scam : manish sisodia's arrest by CBI is tip of iceberg, many big shots are in the line of heat and fire!!

    दिल्ली दारू घोटाळा : मनीष सिसोदियांची अटक हे तर हिमनगाचे टोक, गोवा, तेलंगण तामिळनाडूत अजून बरेच अटकेच्या रांगेत!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दारू परवाना घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होणे, हे तर हिमनगाचे टोक असल्याची दिल्लीच्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सिसोदियांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीच्या राजकारणावर परिणाम होणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला लगाम बसणार, वगैरे बातम्या बातम्यांनी दिल्लीचे माध्यम विश्व व्यापले आहे. पण दारू घोटाळ्याच्या तारा दिल्ली पलिकडे जाऊन आधीच पोहोचल्या आहेत. त्या तारा गोवा, तेलंगण, तामिळनाडू इथे वेगवेगळ्या प्रकारे आधीच “इलेक्ट्रीफाय” झाल्या आहेत!! Delhi liquor scam : manish sisodia’s arrest by CBI is tip of iceberg, many big shots are in the line of heat and fire!!

    दिल्ली दारू घोटाळ्यातील पैसा आम आदमी पार्टीने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा नुसता गंभीर आरोप झालेला नाही, तर सीबीआयने त्या दिशेने तपास देखील सुरू केल्याच्या बातम्या आहेत. त्याआधी सीबीआयची टीम तेलंगणाला पोहोचलीच होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आमदार के. कविता यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी साधारण महिनाभरापूर्वी याच दारू परवाना घोटाळ्याच्या पैशासंदर्भात चौकशी आणि तपास केला होता. मनीष सिसोदियाना अटक होण्यापूर्वी किमान पाच वेळा त्यांची चौकशी आणि तपास त्याचबरोबर त्यांच्या घराची झडती हे सर्व प्रकार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेच होते. हे प्रकार तेलंगणात अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच तामिळनाडू देखील अजून सीबीआयचे अधिकारी अधिकृतरित्या पोहोचलेले नाहीत. परंतु दारू परवाना घोटाळ्यात दिल्लीतील ज्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाचे धागेदोरे तामिळनाडूतही पोहोचले आहेत आणि हे राजकीय परिमाण परिणामांच्या पलिकडचे गंभीर कायदेशीर परिणाम करणारे आहेत.

    मनीष सिसोदियांची झालेली अटक ही पुरावे नष्ट करणे कागदपत्रे जाळणे या आधारावर असून थेट दिल्ली सरकारचे दारू धोरणकर्तेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. यापलिकडे आधीच अटक केलेल्या काही अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे तपास आणि चौकशीत काही बड्या नेत्यांची नावे घेतल्याची दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे. आता अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीवर सीबीआयचे अधिकारी काम करत आहेत. आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष सिसोदिया यांची अटक ही हिमनगाचे एक टोक आहे. अजून बरेच बडे नेते अटकेच्या रांगेत आहेत!!



    मनीष सिसोदियांच्या अटकेमुळे केजरीवाल सरकारलाच नव्हे, तर संपूर्ण आम आदमी पक्षाला फटका बसला आहे. कारण सिसोदिया हे पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्या अटकेमुळे अरविंद केजरीवाल यांना सिसोदिया यांचा पर्याय उभा करणे केवळ अशक्य बनणार आहे.

    सिसोदिया यांना पर्याय नाही

    मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमधील एकूण ३३ पैकी १८ खाती आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचे काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केजरीवाल यांचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचे कामही सिसोदिया पाहत होते. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती आहेत. सिसोदिया यांची जागा घेणे अन्य कोणत्याही नेत्यासाठी सोपे नसेल. फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या उर्वरित खात्यांचा त्याग केला होता. यानंतर सिसोदिया हे विभागही पाहत होते. आम आदमी पक्षात सिसोदिया यांच्या उंचीचा नेता आणि अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातील दुसरा कोणीही व्यक्ती सध्या नाही.

    आगामी निवडणुकांत फटका

    दिल्ली सरकार पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करत आहे. मनीष सिसोदिया हे बजेटचे सर्व काम पाहत होते. अर्थमंत्री सिसोदिया तुरुंगात गेल्यास अर्थसंकल्पाच्या तयारीवरही परिणाम होणार आहे. अर्थसंकल्पावर इतक्या लवकर काम करणे इतर कोणत्याही मंत्र्याला अवघड जाईल. येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथेही आम आदमी पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने या राज्यांमध्ये आपला केडर तयार केले आहे. पंजाबमधील विजयानंतर पक्षाने या राज्यांमध्ये गांभीर्याने निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. या कामात सिसोदिया यांच्यावर मोठी जबाबदारी होती. आता अरविंद केजरीवाल सिसोदियांची जबाबदारी नेमकी कोणावर सोपवणार? आणि ज्या नेत्यावर केजरीवाल जबाबदारी सोपवतील ते नेते तरी किती दिवस बाहेर राहणार?, याविषयी खूप मोठी शंका आहे. कारण अनेक बडे नेते सिसोदिया यांच्या पाठोपाठ अटकेच्या रांगेत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

    Delhi liquor scam : manish sisodia’s arrest by CBI is tip of iceberg, many big shots are in the line of heat and fire!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!