Delhi IGI Airport Bomb Blast Threat E-Mail : अल कायदाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी संध्याकाळी अल कायदाच्या नावाने एक ईमेल आला, ज्यामध्ये पुढील काही दिवसांत आयजीआय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. Delhi IGI Airport Bomb Blast Threat E-Mail By AL Qaeda Received
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अल कायदाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी संध्याकाळी अल कायदाच्या नावाने एक ईमेल आला, ज्यामध्ये पुढील काही दिवसांत आयजीआय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी संध्याकाळी मिळालेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, करणबीर सुरी ऊर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा ऊर्फ हसीना रविवारी सिंगापूरहून भारतात येत आहेत. येत्या एक ते तीन दिवसांत विमानतळावर बॉम्ब ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
डीआयजी म्हणाले की, याआधीही समान नावे आणि तत्सम तपशीलांसह धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यांच्या मते यापूर्वी करणबीर आणि शैली यांचे इसिसचे सूत्रधार म्हणून वर्णन करण्यात आले होते, त्यात असेही लिहिले होते की, दोघेही येत आहेत आणि एक ते तीन दिवसांत ते विमानतळावर बॉम्बस्फोटाचा कट रचतील.
यापूर्वी 18 एप्रिल रोजी दिल्ली विमानतळावर विमान उडवण्याच्या धमकीमुळे खळबळ माजली होती. बंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाला वॉशरूममध्ये एक स्लिप सापडली होती, ज्यात लिहिले होते की विमानात बॉम्ब आहे आणि दिल्ली विमानतळावर पोहोचताच तो उडेल.
विमान दिल्ली विमानतळावर पोहोचताच बॉम्ब शोधक पथकाने त्याचा कसून शोध घेतला. पण विमानात कोणतीही स्फोटके सापडले नाहीत. विमानतळाचे पोलीस उपायुक्त राजीव रंजन यांनी सांगितले होते की, विमान उडवण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका प्रवाशाने विमानाच्या वॉशरूममध्ये टिश्यू पेपरचा तुकडा पडलेला पाहिला होता. ज्यात असे लिहिले होते की बंगलोरहून दिल्लीला येणाऱ्या एअर एशियाच्या विमानात बॉम्ब आहे.
दिल्लीत पोहोचताच विमानात स्फोट होईल. प्रवाशाने तत्काळ आयजीआय विमानतळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी विमानतळाच्या सुरक्षेत तैनात सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले होते. त्याचबरोबर विमानतळावर बॉम्ब निकामी करणारे पथक तैनात करण्यात आले.
विमानतळावर पोहोचताच ते विमान पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि प्रत्येक ठिकाणी शोध घेण्यात आला. शोधादरम्यान विमानातून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
Delhi IGI Airport Bomb Blast Threat E-Mail By AL Qaeda Received
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लसीचा मिश्र डोस घेणे सुरक्षित आहे का? ICMRने केले संशोधन
- अमेरिकी हवाई दलाचा अफगाणिस्तानातील तालिबानी ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव, तब्बल ५७२ दहशतवाद्यांचा खात्मा
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमक्या, वडील म्हणाले – गाव सोडण्याची आली वेळ
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…