• Download App
    Most Polluted City :चिंताजनक! जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये; लाहोर दुसऱ्या स्थानी|Delhi has the highest air pollution in the world

    Most Polluted City :चिंताजनक! जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये; लाहोर दुसऱ्या स्थानी

    दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संरक्षण समितीकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. (Delhi has the highest air pollution in the world)


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संरक्षण समितीकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार दिल्लीचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषीत शहरांमध्ये करण्यात आला आहे.

    दिल्लीचा एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 188 पीएम पेक्षा देखील अधिक आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते हवा प्रदूषणाची ही सर्वाधिक धोकादायक पातळी असून, या प्रदूषणाचा गंभीर दुष्परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 50  पेक्षा कमी असल्यास तेथील हवेचा दर्ज सर्वोत्तम मानण्यात येतो.



    दिल्लीतील हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर देशाभरताील पर्यावरण तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या सिमेला लागून असलेल्या पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये खरीप हगंमातील पीक कापनीनंतर पिकांचे अवशेष जाळण्यात येतात. त्याचा फटका हा दिल्लीला बसत असून, यामुळे शहरातील हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

    या सोबतच शहरामध्ये वाहनांची संख्या वाढल्याने देखील प्रदूषणात भर पडली आहे. दिल्लीतील हवा प्रदूषणाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याचाच एक भाग म्हणून शहरात सम, विषम पद्धत लागू  केली होती.

    या  उपाययोजनेनुसार एका दिवस सम नंबर असलेल्या वाहनांना तर  दुसऱया दिवशी विषम नंबर असलेल्या वाहनांना दिल्लीमध्ये चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शेतातील कचरा न जाळण्याचे आवाहन देखील केजरीवाल यांच्याकडून हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

    लाहोर दुसऱया क्रमांकावर 

    दिल्लीपाठोपाठ पाकिस्तानमधील लाहोर हवाप्रदूषणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाहोरचा एअर क्वॉलेटी इंडेक्स देखील 188 पीएम पेक्षा अधिक आहे. लाहोरमध्ये प्रमाणापेक्षा अधिक लोकसंख्या वाढली असून, त्यामुळे वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

    वाहनांच्या धुरामधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड या सारख्ये घटक हवेत मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने लाहोरमध्ये हवेचा दर्ज खालावल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले  आहे. हवा प्रदूषणामध्ये तिसऱया क्रमांकावर बिश्केक शहर असून, भारतातील कोलकाता चौथ्या स्थानी आहे. तर चीनमधील बीजिंग शहर पाचव्या स्थानी आहे.

    औद्योगिकरणामुळे प्रदूषणात वाढ 

    जगात औद्योगिकरण झपाट्याने वाढत असून, वाढत्या औद्योगिकरणामुळे विविध विषारी वायू हवेत सोडले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हवेचा दर्जा खालावत चालला आहे. वाढत्या हवाप्रदूषणामुळे मानवाची प्रतिकार शक्ती कमी होत असून, विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. सोबतच अकाली मृत्यूचा धोका देखील वाढला आहे.

    Delhi has the highest air pollution in the world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित