विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या राजधानी दिल्लीतील पहिल्या हवा शुद्धीकरण संयंत्राचे (स्मॉग टॉवर) उद्घाटन झाले. टॉवरच्या माध्यमातून हवेतील दूषित घटक खेचून घेऊन स्वच्छ करून ते १० मीटर उंचीवर परत सोडण्याची यंत्रणा आहे.Delhi gets first smog tower
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कॅनॉट प्लेस भागातील या पहिल्या स्मॉग टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. हा २४ मीटर उंच मनोरा आसपासच्या किमान एक किलोमीटरच्या परिघातील दूषित हवेचे शुद्धीकरण करेल. दूषित हवा आत घेऊन शुद्ध हवा वातावरणात सोडणारे हे संयंत्र देशातील अशा प्रकारचे पहिलेच मानले जाते.
प्रदूषणाविरूद्ध दिल्लीच्या लढाईतील हा एक ठळक टप्पा मानला जातो. दिल्ली मंत्रिमंडळाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या स्मॉग टॉवरला मंजुरी दिली होती. मात्र कोरोना लॉकडाउनमुळे तो प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यास वेळापत्रकानुसार उशीर झाला.
पुढील दोन वर्षे त्याच्या निकालांचा अभ्यास करण्यात येईल. या पहिल्या स्मॉग टॉवरमुळे हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम तपासून यानंतर दिल्लीत किती ठिकाणी अशी संयंत्रे भारायची याचा निर्णय केजरीवाल सरकार करणार आहे.दिल्लीत दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात हवा कमालीची प्रदूषित होते. शेजारच्या राज्यांत शेतातील काडीकचरा जाळल्यामुळे त्याचा धूर थेट दिल्लीत येतो व दिल्लीतील हवा कमालीची प्रदूषित होते.
Delhi gets first smog tower
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानातील वैद्यकीय जागांची गरीब विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला
- नागरिकांसाठी सुविधांचे नवे पर्व, आता व्हॉटसअॅपवर घेता येणार कोरोना लसीकरणाची वेळ
- केंद्रीय मंत्री असताना अटक झालेले नारायण राणे तिसरे, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांनाही मंत्रीपदावर असताना पोलीसांनी केली होती अटक
- तालिबानचा कहर : अफगाणिस्तानात दुप्पट झाल्या बुरख्याच्या किमती , जीन्स घातल्याबद्दल झाली मारहाण