• Download App
    ऑक्सिजनच्या पुरवठ्याने आला राजधानी दिल्लीच्या प्राणात प्राण ७० टन प्राणवायू पोहोचला|Delhi gets 70 ton oxygen by railway

    ऑक्सिजनच्या पुरवठ्याने आला राजधानी दिल्लीच्या प्राणात प्राण ७० टन प्राणवायू पोहोचला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चार टँकरमधून ७० टन प्राणवायू वाहून आणणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसचे आगमन आज सकाळी राजधानीत झाले. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराने आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने बेहाल झालेल्या नवी दिल्लीला थोडा दिलासा मिळाला आहे.Delhi gets 70 ton oxygen by railway

    हा ऑक्सिजन दिल्ली सरकारतर्फे विविध रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ‘#ऑक्सिजन एक्स्प्रेस’ छ्त्तीसगडमधील रायगडमधून रुग्णांसाठी ऑक्सिजन घेऊन दिल्लीला पोचली आहे.



    कोरोनाविरुद्धच्या आपल्या एकत्रित लढ्यात जीव वाचविण्यासाठी भारतीय रेल्वे शक्य ते सर्व प्रयत्न करीत असून देशभरात प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करीत आहे, ’ असे ट्विट केले आहे.

    ही ऑक्सिजन एक्स्प्रेस दिल्ली कँट रेल्वे स्थानकावर सकाळी पोचली. रायगड येथील जिंदाल स्टिल वर्क्स कारखान्यातून या रेल्वेने रविवारी (ता.२५) रात्री दिल्लीकडे कूच केले होते. फोर्टिस, मॅक्स, बी.एल. कपूर रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये हा ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.

    Delhi gets 70 ton oxygen by railway

    Related posts

    Humayun Kabir : निलंबित TMC आमदार हुमायू म्हणाले- मी बंगालचा ओवैसी; 2026 मध्ये किंगमेकर बनेन, माझ्याशिवाय सरकार बनणार नाही

    CJI Surya Kant : रोहिंग्याप्रकरणी CJIच्या समर्थनार्थ 44 माजी न्यायाधीश; म्हणाले- विधानाचा चुकीचा अर्थ काढला

    Rahul Gandhi : राहुल संसद अधिवेशनादरम्यान जर्मनीला जाणार; भाजपने म्हटले- त्यांच्यासाठी LoP म्हणजे लीडर ऑफ पर्यटन