जाणून घ्या, याचिका फेटाळताना न्यायालयाने काय म्हटले?
विशेष प्रतिनिधी
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया दिल्ली उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. Delhi excise policy Court denies bail to Manish Sisodia in CBI case
कर्नाटकात निवडणूक आचारसंहिता लागू; मुख्यमंत्र्यांच्या कारचीही भर रस्त्यात पोलीस झडती!!
मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून दीर्घ चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिहार तुरुंगात त्यांची दीर्घकाळ चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. या प्रकरणातही सिसोदिया यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने काय म्हटले? –
विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी २४ मार्च रोजी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, मनीष सिसोदिया यांना आता जामीन दिला गेला तर तो तपासावर प्रभाव टाकू शकतो आणि पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते.
मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सिसोदिया यांच्या भूमिकेबाबतचा तपास अद्याप पूर्ण व्हायचा आहे, अशा स्थितीत सिसोदिया यांची या टप्प्यावर जामिनावर सुटका होऊ शकत नाही. या प्रकरणातील सहआरोपींविरुद्ध अद्याप तपास सुरू असल्याचे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणातील केवळ ७ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अन्य आरोपींविरुद्ध तपास सुरू असल्याचे न्यायालयाने सांगितले.
Delhi excise policy Court denies bail to Manish Sisodia in CBI case
महत्वाच्या बातम्या
- TSPSC Paper Leak : तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवनाथ रेड्डी पोहचले ED कार्यालयात
- गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!!
- छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल
- संजय राऊत सारखा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो – चंद्रशेखर बावनकुळे