• Download App
    यमुनेच्या पुरात दिल्ली बुडाली, महात्मा गांधींची समाधी पाण्यात; सुप्रीम कोर्टाला पाणी थेटले पण केजरीवालांचा "शिशमहाल" कोरडा ठाक!! Delhi drowned in Yamuna flood, Mahatma Gandhi's mausoleum in water

    यमुनेच्या पुरात दिल्ली बुडाली, महात्मा गांधींची समाधी पाण्यात; सुप्रीम कोर्टाला पाणी थेटले पण केजरीवालांचा “शिशमहाल” कोरडा ठाक!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने कहर केल्यानंतर गंगा यमुनेला महापूर आला. त्यातल्या यमुनेच्या महापुरात दिल्ली बुडाली महात्मा गांधींची समाधी पाण्यात गेली. सुप्रीम कोर्टाला पाणी येऊन थटले. पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभित केलेला त्यांचा सरकारी बंगला मात्र आजही कोरडा ठाक आहे. किंबहुना आपला बंगला कोरडा ठाक ठेवण्यात अरविंद केजरीवाल यांना “यश” आले आहे. Delhi drowned in Yamuna flood, Mahatma Gandhi’s mausoleum in water

    यमुनेच्या काठावरची गावे तर पुरात बुडालीच आहेत. पण राजघाटाचा परिसरही पूर्णपणे पाण्यात गेला आहे. त्यामुळे महात्मा गांधींची समाधी यमुनेच्या पुराच्या पाण्यात आहे. जुन्या दिल्लीतले बहुतांश भाग पाण्याखाली आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता एनडीआरएफची मदत घेतली आहे.

    स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून दिल्लीतल्या पुरा संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर एनडीआरएफ ची टीम कार्यरत झाली.

    दरम्यानच्या गळ्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जुन्या दिल्लीतल्या काही भागांना भेटी देऊन पूरग्रस्त नागरिकांना तेथून हलवण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही नागरिक त्यांनी तिथून सुरक्षित हलवले. पण आत्ताही बहुसंख्य नागरिक पुराच्या पाण्यातच अडकलेले आहेत. यमुनेला आलेल्या मोठ्या उफाणाचे पाणी सुप्रीम कोर्टापर्यंत येऊन थडकले. सुप्रीम कोर्टातच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. सुप्रीम कोर्ट नवी दिल्लीतल्या टिळक रोडवर आहे. त्या परिसरातील अनेक इमारतींच्या पार्किंग एरियात पाणी शिरले.

    पण नवी दिल्लीतच असलेला अरविंद केजरीवाल यांचा सरकारी बंगला मात्र कोरडा ठाक राहिला. कोट्यावधी रुपये खर्च करून केजरीवाल यांनी हा बंगला सुशोभित केला आहे. या मुद्द्यावरून “कॅग”ने त्यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आणि दिल्ली हायकोर्ट त्याविषयी याचिका दाखल झाली. त्याची सुनावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. पण यमुनेच्या महापुरात देखील आपला “शिशमहल” कोरडा ठेवण्यात “आम आदमी” अरविंद केजरीवालांना “यश” आले आहे.

    Delhi drowned in Yamuna flood, Mahatma Gandhi’s mausoleum in water

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य