• Download App
    उमर खालिद, खालिद सैफी म्हणजे काही ‘गँगस्टर’ नाहीत – न्यायालयाने पोलिसांना फटकारले |Delhi court lashes on Police

    उमर खालिद, खालिद सैफी म्हणजे काही ‘गँगस्टर’ नाहीत – न्यायालयाने पोलिसांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जवाहरलाल विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि खालिद सैफी हे दोघे म्हणजे ‘गँगस्टर’ नाहीत अशा शब्दांत फटकारत न्यायालयात बेड्या घातलेल्या स्थितीत आणण्याची पोलिसांनी मागितलेली परवानगी येथील न्यायालयाने फेटाळून लावली.Delhi court lashes on Police

    दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या दंगलीतील सहभागावरून खालिद आणि सैफी यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही धोकादायक आरोपी असल्याने न्यायालयात मागील दाराने त्यांना बेड्या घातलेल्या स्थितीत आणण्याची परवानगी पोलिसांनी मागितली होती.



    ‘पोलिसांनी सारासार विचार न करताच ही मागणी केली आहे. दोघाही आरोपींवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. ते गँगस्टरही नाहीत,’ असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले.

    तसेच, सध्याच्या कोरोना स्थितीमुळे आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजरही करण्याची आवश्य्कता नसल्याने अशा प्रकारच्या मागणीचीही गरज नव्हती, असेही न्यायालयाने फटकारले

    Delhi court lashes on Police

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- भारत आणि अमेरिकेत काही समस्या आहेत; अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लादणे चुकीचे