सिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेने शेतकऱ्यांना संसदेचा घेराव करून खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन करणारा ऑनलाइन व्हिडिओ जारी केल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे. Delhi Conspiracy to March on Parliament and hoist Khalistani flag, police-intelligence agencies on alert
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेने शेतकऱ्यांना संसदेचा घेराव करून खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन करणारा ऑनलाइन व्हिडिओ जारी केल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे.
सिरसा येथील शेतकरी आंदोलनांतर्गत संसदेपर्यंतच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत शनिवारी फोनही झाला होता. यामध्ये ट्रॅक्टरसह संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच खलिस्तानचा झेंडाही हाती घेण्याची चर्चा होती. कॉलदरम्यान सिख फॉर जस्टिस यासाठी 1.25 दशलक्ष डॉलर्स देणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी लोकांच्या मोबाइलवर फोन आला. यामध्ये 29 नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर घेऊन संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेषत: पंजाबमधील शेतकरी आणि तरुणांना पंजाबीत संबोधित करताना खलिस्तानचा केसरी झेंडा घेऊन वर जा, असे म्हटले होते. यावर सिख फॉर जस्टिस १.२५ लाख डॉलर्स देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे, बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Delhi Conspiracy to March on Parliament and hoist Khalistani flag, police-intelligence agencies on alert
महत्त्वाच्या बातम्या
- SCHOOLS REOPEN : शाळेचा मुहुर्ताला पुन्हा ब्रेक?आज होणार निर्णय; कॅबिनेट बैठकीकडं महाराष्ट्राचं लक्ष
- NEW GUIDELINES : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बंधने ; वाचा सविस्तर
- ज्येष्ठांनो उत्तम आरोग्यासाठी बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करा
- बॅंकांना गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्यांचा माग काढू – निर्मला सीतारामन
- Corona Variant Omicron : सतर्क राहा! ओमिक्रॉनमुळे भारताला गंभीर इशारा ; मास्क म्हणजे खिशातील लस ; WHOचे आवाहन
- रानडुकराच्या शिकारीची केरळची परवानगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने फेटाळली