विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – तत्कालीन मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर २०१८ साली झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाच्या नऊ आमदारांची निर्दोष मुक्तता केली.Delhi CM Kejriwal and Dy. CM sisodiya aquited by court
न्यायालयाच्या या निकालाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत केले आहे. या निकालाच्या निमित्ताने सत्याचा विजय झाला असल्याची सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय तपास संस्था केजरीवालांच्याविरोधात कारस्थान रचत असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. केजरीवालांनीही ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीतच अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अकरा आमदारांना आरोपी करण्यात आले होते.
केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह नऊ आमदारांना ऑक्टोबर २०१८ मध्येच जामीन मंजूर करण्यात आला होता. या घटनेनंतर दिल्ली सरकारविरुद्ध नोकरशहा असा संघर्ष पेटला होता.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश देताना आपचे आमदार अमानतुल्ला आणि प्रकाश जारवाल यांच्यावर आरोप निश्चिलत करण्याचे आदेश दिले.
Delhi CM Kejriwal and Dy. CM sisodiya aquited by court
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंडच् दुर्गम खेड्पाड्यात मध्ये आता चक्क मोटारीतून होणार न्यायदान, ई-न्यायालयाचा देशातील पहिलाच प्रयोग
- देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड
- मदरशांसह सर्व धार्मिक अल्पसंख्याक शाळांना आरटीई कक्षेत आणण्याची केंद्राकडे शिफारस
- कर्नाटकात भाजप, संघ कार्यकर्त्यांवरील खटले सरकार मागे घेणार
- चीनने दोनदा scuttle केलेला सागरी सुरक्षेचा विषय भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या अजेंड्यावर आणला कसा…?? वाचा…!!