• Download App
    दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल विलगीकरणात, पत्नी सुनीता यांना झाली कोरोनाची लागण । Delhi CM Arvind Kejriwal Isolate Himself As His Wife Sunita Kejriwal Tested Positive For corona

    दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विलगीकरणात, पत्नी सुनीता यांना झाली कोरोनाची लागण

    Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत. Delhi CM Arvind Kejriwal Isolate Himself As His Wife Sunita Kejriwal Tested Positive For corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सोमवारी 23,500 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी 24 तासांत सुमारे 25,500 रुग्ण आढळले. संसर्गाचे प्रमाण 24 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याचाच अर्थ दिल्लीत प्रत्येक दहामधील तिसरा व्यक्ती कोरोनाबाधित असू शकतो. यामुळे दिल्लीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    लॉकडाउनचा पहिला दिवस

    वाढत्या संसर्गामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे. सोमवार, 26 एप्रिल सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. लोकांना उपचार घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. रुग्णालयात बेडची मोठी कमतरता आहे. उपचार घेण्यासाठी बेड किंवा औषधेही मिळत नाहीत. काही ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे. तथापि, केंद्राने यात लक्ष घातले असून दिल्लीसह इतर राज्यांना ऑक्सिजनचा सुरळित पुरवठा व्हावा यासाठी तातडीची पावले उचलली आहेत.

    Delhi CM Arvind Kejriwal Isolate Himself As His Wife Sunita Kejriwal Tested Positive For corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस