वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भाजी मार्केट दिल्लीच्या मलका गंज परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याबाहेर काढलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.Delhi Building Collapses Four storey building collapsed in Delhi Sabzi Mandi area CM expressed grief
ढिगाऱ्याखालून काढताच या दोन्ही मुलांना हिंदुराव रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. एका मुलाचे वय 12 वर्षे, तर दुसऱ्याचे अवघे 7 वर्षे होते.
इमारतीच्या तळमजल्यावर दुधाची डेअरी होती. एक कारसुद्धा या दुर्घटनेत अडकली आहे. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक लोकांची गर्दी जमली आहे. त्याचबरोबर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी ट्वीट केले की, “भाजी मंडई परिसरात इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात व्यग्र आहे, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मी वैयक्तिकरीत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Delhi Building Collapses Four storey building collapsed in Delhi Sabzi Mandi area CM expressed grief
महत्त्वाच्या बातम्या
- Gujarat New CM : भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, 15 महिन्यांनी राज्यात होणार निवडणुका
- कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन, डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
- पेगासस हेरगिरी प्रकरणात केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले – एखादे सॉफ्टवेअर वापरले किंवा नाही, हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही
- मोदी सरकारकडून ब्रह्मपुत्रा नदीखालून 15.6 किमीचा दुहेरी बोगदा प्रस्तावित, आसाम ते अरुणाचल प्रवासाचा वेळ वाचणार