कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरेल्या लष्कराला मदतीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लष्कराला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.Defense Minister Rajnath Singh announces special economic powers to Army
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरेल्या लष्कराला मदतीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लष्कराला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत साधनसामुग्रीची कमतरता भासत आहे. अनेक राज्यांत पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. त्यामुळे या संकटाविरुध्द लढण्यासाठी आता लष्कर उतरले आहे.
लष्कराची तीनही दले आपले कर्तव्य बजावत आहेत. या काळात लष्कराला मदत करताना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संरक्षण मंत्र्यांनी आर्तिक आधशर दिले आहेत.
या आर्थिक निधीतून लष्कराला क्वारंटाईन सेंटर उभारणी, रुग्णालयांमध्ये सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय साधनांची दुरुस्ती करता येणार आहे.
लष्कराच्या विविध विभागाच्या कमांडटना त्यामुळे मदतकार्य करणे सोपे होणार आहे. एरिआ कमांडटना ५० लाख आणि सब एरिआ कमांडरना २० लाख रुपये खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार मिळणार आहेत.
Defense Minister Rajnath Singh announces special economic powers to Army