वृत्तसंस्था
मुंबई : काही बेजबाबदार देश आपल्या वर्चस्ववादी वर्तनातून सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात आणि मनमानीपणे समुद्रात आपले वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न करतात, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनवर हल्लाबोल केला.Defence Minister Rajnath Singh attended the commissioning of INS Visakhapatnam at Mumbai dockyard
आशिया प्रशांत महासागरात भारत आग्नेय आशियातील देश, ऑस्ट्रेलिया या सर्वांशी चीनचा संघर्ष आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह बोलत होतो भारतीय नौदलाची विनाशिका आयएनएस विशाखापट्टणम हिच्या कमिशनिंगच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आपली सागरी सुरक्षा व्यवस्थित जाणतो. कोणत्याही स्थितीत आम्ही आमच्या सुरक्षिततेशी आणि सार्वभौमत्व अशी तडजोड करणार नाही. परंतु काही वर्चस्ववादी देश बेजबाबदारपणे आपल्याला हवे तसे वर्तन करून संयुक्त राष्ट्र संघाने सामुद्रिक सुरक्षेविषयी केलेली नियमावली बदलत असतात. त्याचा हवा तो अर्थ लावत असतात, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.
भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या सामुद्रिक सुरक्षेविषयीच्या प्राधान्यक्रमावर देखील राजनाथ सिंग यांनी भाष्य केले.
INS विशाखापट्टणमचे वैशिष्ट्य
INS विशाखापट्टणमची (INS Visakhapatnam) लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7400 टन आहे. त्याचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे. INS विशाखापट्टणमला चार वेगवेगळ्या गॅस टर्बाइन इंजिनमधून शक्ती मिळते.
अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि सेन्सर्स पहिले स्वदेशी गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाज.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले
संरक्षण क्षेत्रासाठी सरकारकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. यशाचा हा वेग कायम राखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. भारतीय नौदलाच्या या पहिल्या PB15 स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक युद्धनौकेमध्ये भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
स्वदेशी युद्धनौका नौदलासाठी मैलाचा दगड आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला कडवी टक्कर मिळणार आहे. या युद्धनौकेत अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रेही बसवण्यात आली आहेत.नौदलाने ट्वीट करून माहिती दिली होती की, मुंबईतील माझगाव डॉक येथे तयार केलेले पहिले स्वदेशी बनावटीचे गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाज P15B ‘विशाखापट्टणम’ 28 ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते.
जानेवारी 2011 च्या करारानुसार INS विशाखापट्टणमची निर्मिती करण्यात आली आहे. नौदलाला 3 वर्षांच्या विलंबानंतर हे जहाज मिळाले आहे. याशिवाय आणखी तीन विनाशकारी जहाजे बांधली जाणार आहेत. या चौघांची एकूण किंमत सुमारे 35,000 कोटी रुपये आहे.
स्वदेशी गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर त्याच्या डेकमधूनच विमानविरोधी क्षेपणास्त्र डागू शकतो. याच्या मदतीने शत्रूची विमाने आणि त्यांची क्षेपणास्त्रे काही सेकंदात नष्ट केली जाऊ शकतात. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र, बराक क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर अनेक सेन्सर्स आणि शस्त्रे बसवता येतील.
Defence Minister Rajnath Singh attended the commissioning of INS Visakhapatnam at Mumbai dockyard
महत्त्वाच्या बातम्या
- माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल
- केआरके यांनी कंगना राणावत विरोधी केलेले ट्विट होतेय व्हायरल
- सौदी अरेबियाच्या अनेक शहरांवर हल्ला, हौथी बंडखोरांनी बॉम्बने लादलेल्या १४ ड्रोनचा वापर केला, तेल रिफायनरीसह विमानतळ लक्ष्य
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ