वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये मोठी तयारी केली आहे. त्या दृष्टीने अधिक सकारात्मक बातमी आली आहे. जगभरातील संरक्षण सामग्री निर्यातदार देशांच्या यादीत भारत पहिल्या 25 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.Defence exports mean an increase in our capability, calibre, standard.
भारताला अजून मोठी झेप घेण्याची आशा आणि अपेक्षा आहे. परंतु पहिल्या 25 देशांमध्ये ही देखील अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च सेंटरने सन 2020 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात संरक्षण सामग्री निर्यातदार देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश पहिल्या 25 देशांमध्ये केला आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. त्याच वेळी आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण साहित्य निर्मिती यांचा संबंध त्यांनी उलगडून सांगितला. भारताने सन 2024 – 25 मध्ये 35 हजार कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ते लवकरात लवकर ओलांडण्यास येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
देशातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरी चे रूपांतर संरक्षण सामग्री निर्मिती कंपन्यांमध्ये करून भारताने त्यादृष्टीने तयारी केली आहे. लवकरच या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होईल. जागतिक पातळीवरील गुणवत्तेच्या निकषांवर आधारित भारतीय उत्पादने जगाच्या संरक्षण सामग्री क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतील. जगातील अन्य देशांच्या गरजांनुसार भारतात संरक्षण सामग्री बनवता येईल. यामध्ये हवाईदल, पायदळ आणि नौदल या सर्वांना सैन्य आवश्यकतेनुसार सामग्री बनवून भारत निर्यात करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवत्तेच्या निकषावर भारताची संरक्षण सामग्री देशात अव्वल ठरण्यासाठी संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा केंद्र सरकारने गुंतवणूक केली आहे. तेथे विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी येत्या पाच ते दहा वर्षात उपलब्ध होईल, अशी माहिती देखील राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
Defence exports mean an increase in our capability, calibre, standard.
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना