• Download App
    बृजभूषण शरण सिंहांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय Decision to remove Brijbhushan Sharan Singh from the post of President of Wrestling Federation of India

    बृजभूषण शरण सिंहांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेले खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल 7.00 तासाच्या बैठकीनंतर अखेर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय  कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरुन दूर ठेवण्यात येणार आहे. Decision to remove Brijbhushan Sharan Singh from the post of President of Wrestling Federation of India

    केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह यांना मोठा झटका मानला जात आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटूंनी आपले धरणे आंदोलनही मागे घेतले आहे.

    भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरु केले होते. शुक्रवारी या कुस्तीपटूंनी पुन्हा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. तब्बल सात तास ही बैठक चालली. त्यानंतर रात्री उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना कुस्तीपटूंसोबत एक पत्रकार परिषद घेत, मोठा निर्णय जाहीर केला.

    चौकशी समिती स्थापन

    बृजभूषण सिंह यांची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल. या समितीतील सदस्यांची नावे  लवकरच घोषित केली जाणार आहेत. ही समिती आठवड्यात आपली चौकशी पूर्ण करणार आहे.

    Decision to remove Brijbhushan Sharan Singh from the post of President of Wrestling Federation of India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!