- जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. ह्या बैठकीत रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
- पुन्हा ज्यावेळेस सीसीएसची बैठक होईल त्यावेळेस मात्र नव्या सीडीएसवर चर्चा होणार आहे.
- जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर रहाण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय लष्कराची कमान सांभाळणारे देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालं . त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं (CDS) पद रिक्त झालंय. आज जनरल रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. पण सीडीएससारखं सर्वोच्च लष्करी पद हे फार काळ रिक्त ठेवता येणार नाही. जनरल रावत यांच्या निधनानंतर आता नवे सीडीएस कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी एकमेव आणि आघाडीचं नाव आहे सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (Gen Naravane)
Death of CDS Rawat leaves a vacuum at top level of the military hierarchy
चीन आणि पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरु आहेत, त्या पार्श्वभूमीवर ह्या पदावर लवकरात लवकर नियुक्ती करणे आवश्यक आहे .त्यामुळेच काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. ह्या कमिटीत देशाच्या लष्करासंबंधीच्या सर्व निर्णयाची चर्चा होते. निर्णय घेतले जातात.
जनरल रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सीसीएसची (CCS) बैठक झाली. ह्या बैठकीत रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि बैठक संपली. पुन्हा ज्यावेळेस सीसीएसची बैठक होईल त्यावेळेस मात्र नव्या सीडीएसवर चर्चा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Death of CDS Rawat leaves a vacuum at top level of the military hierarchy
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीबांचे घराचे स्वप्न आणखी सोपे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला २०२४ पर्यंत मुदतवाढ
- पंकजा मुंडे यांचे समर्थकांना भावनिक पत्र, विशेष संकल्प करणार असल्याची माहिती
- Bipin Rawat : सीमेवरचीन आणि पाकिस्तानचे आव्हान ! रावत यांच्या निधनामुळे नवे संकट ; सीडीएसचे पद जास्त काळ रिक्त ठेवता येणार नाही
- प्रायाश्चित करायचे असेल तर मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, प्रविण तोगडिया यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा