वृत्तसंस्था
अहमदाबाद : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात वजूखान्यात शिवलिंग आढळून आले, त्यावरून अश्लील आणि अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. Danish Qureshi arrested for making obscene tweets
दानिश कुरेशी हा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचा नेता होता. काही दिवसांपूर्वी त्याला पक्षाने काढून टाकले आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग आढळल्याची बातमी येताच दानिश कुरेशीने अश्लील आणि अभद्र टिपणी करणारे ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर संताप उसळला आहे. त्याच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटनांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुजरात पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
दानिश कुरेशी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फौजदारी कायद्याच्या 153 ए आणि 295 ए कलमानुसार पोलिसांनी एसआरएफ दाखल केली आहे. समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे आणि भडकावणे या संदर्भात ही कलमे आहेत. अहमदाबाद पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी दानिश कुरेशीला अटक केली आहे. दानिश कुरेशीच्या विरोधात तक्रारी आल्याबरोबर सायबर सेलने त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली. तो शहापूरमध्ये आढळला. तेथे जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती अहमदाबादचे सायबर क्राईम पोलीस सह आयुक्त जे. एम. यादव यांनी पत्रकारांना दिली आहे.
Danish Qureshi arrested for making obscene tweets
महत्वाच्या बातम्या