• Download App
    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना 'फ्लू'ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला।Danger of the third wave of corona ?; It is important to vaccinate children against the flu

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच वर्षांखालील मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याद्वारे कोरोनाचा संसर्ग रोखता येईल, असा दावा केला आहे. Danger of the third wave of corona ?; It is important to vaccinate children against the flu

    मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी असतो, असे तज्ज्ञ सांगत होते. पण काही ठिकाणी मुलांना कोरोना झाला आहे. त्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना इन्फ्लुएंझा लस दिली जावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही दिवसांपूर्वी केले होते.



    कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 60 वर्षावरील वृद्ध तर दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठा झाला. अनेकांनी कोरोनाविरोधी लस घेतली. पण, तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    तिसऱ्या लाटेदरम्यान बालकांमध्ये तीव्र प्रकारचा ताप किंवा लक्षणं दिसू नयेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे पाच वर्षाच्या आतील मुलांना फ्लूची लस द्यावी अशी शिफारस इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सने केली आहे. अमेरिकेतील अभ्यासातून स्पष्ट झालंय की, ज्या मुलांना इन्फ्लूएंझा फ्लूची लस देण्यात आली आहे त्या मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात झाला आहे.

    Danger of the third wave of corona ?; It is important to vaccinate children against the flu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप