विशेष प्रतिनिधी
नोएडा – उत्तर प्रदेशच्या जवार भागात एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणातील चार पैकी एका आरोपीची ओळख पटली आहे. जेवर गावात रविवारी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय दलित महिलेला चौघांनी ओलिस ठेवले आणि शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.Dalit women raped in UP
पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत सोडून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला नोएडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार चौघांविरोधात सामूहिक बलात्कार आणि ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीची ओळख पटली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पीडित महिलेच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवर विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीवर चारा गोळा करण्यासाठी पीडित महिला गेली होती. यादरम्यान तेथे चार जण पोचले आणि तिला एकटी असल्याचे पाहून शस्त्राचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर चौघांनी अत्याचार केले. पीडितेला मारहाणही केली आणि जातिवाचक शिवीगाळही केली. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
Dalit women raped in UP
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू