Daily Corona Cases in India : भारतातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आता खालावताना दिसत आहे. यामुळे किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागच्या सलग चार ते पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 3 लाख 29 हजार 942 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणामुळे 3876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 लाख 49 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 56 हजार 082 रुग्णांनी कोरोनाचा पराभव केला आहे. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. Daily Corona Cases in India Reduced than Past Week, 3.29 lakh Found in last 24 Hours
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आता खालावताना दिसत आहे. यामुळे किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागच्या सलग चार ते पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 3 लाख 29 हजार 942 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणामुळे 3876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 लाख 49 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 56 हजार 082 रुग्णांनी कोरोनाचा पराभव केला आहे. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत.
देशातील कोरोनाची सद्य:स्थिती
एकूण कोरोना रुग्णसंख्या – 2 कोटी 26 लाख 62 हजार 575
एकूण बरे झालेले रुग्ण – 1 कोटी 90 लाख 27 हजार 304
देशातील एकूण मृत्यू – 2 लाख 49 हजार 992
देशातील सक्रिय रुग्णसंख्या – 37 लाख 15 हजार 221
देशातील एकूण लसीकरण – 17 कोटी 27 लाख 10 हजार 066
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत घट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव झाला होता. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी कोरोनाचे 37 हजार 236 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापूर्वी राज्यात सातत्याने 60 हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळत होती. राज्यातील एकूण बाधितांची आकडेवारी 51 लाख 38 हजार 973 वर गेली आहे. सध्या राज्यात 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर राज्यात 24 तासांत 549 रुग्णांचा मृत्यूही नोंदवण्यात आला आहे. यामुळे एकूण मृत्यूंचे प्रमाण वाढून 76 हजार 398 पर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंत राज्यातील 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
दिल्लीत 80 हजारांहून अधिक सक्रिय रुग्णसंख्या
आदल्या दिवशी कोरोना संसर्गाच्या बाबतीत दिल्लीत किंचित घट नोंदवण्यात आली. राष्ट्रीय राजधानीत 12 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. हा मोठा दिलासा आहे. कारण दिल्लीत यापूर्वी 35 हजारांपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली होती. दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 19 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कित्येक दिवसांनी ते 20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. दिल्लीत 80 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
इतर राज्यांत काय परिस्थिती?
कोरोना संसर्गामुळे देशातील अनेक राज्यांत भयंकर विध्वंस होताना दिसून येत आहे. कर्नाटक, बिहार, बंगाल, यूपीसह बर्याच राज्यांत कोरोना संसर्गाचा वेग अनियंत्रित होताना दिसत आहे. या राज्यांतील रुग्णांनाही बेड आणि ऑक्सिजनच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
आतापर्यंत 17.26 कोटी नागरिकांचे लसीकरण
कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी 16 जानेवारीपासून देशभरात ऐतिहासिक लसीकरण अभियानाचा प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे 17.26 कोटी डोस देण्यात आलेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, 18 ते 44 वयोगटातील 5,18,479 लाभार्थींना सोमवारी पहिला डोस मिळाला असून या वर्गातील तिसर्या टप्प्याच्या सुरुवातीपासूनच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 25,52,843 पर्यंत वाढली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीकरण मोहिमेच्या (१० मे २०२१) 115व्या दिवशी एकूण 24,30,017 डोस देण्यात आले. यात 10,47,092 डोस पहिल्यांदा देण्यात आले होते, तर 13,82,925 दुसऱ्या डोसचा समावेश होता.
Daily Corona Cases India Reduced than Past Week, 3.29 lakh Found in last 24 Hours
महत्त्वाच्या बातम्या
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची का? ; मग शेवग्याची भाजी आवश्य खा
- फळांचा राजा आंबा औषधी गुणांची खाण, पक्व फळ हृदयाला हितकर; वात – पित्तशामकही
- कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दान केला ‘राधे-श्यामचा’ सेट; औषधं-ऑक्सिजन इ.सर्व खर्च करणार अभिनेता प्रभास
- आनंदाची बातमी : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’ लसीचीही निर्मिती !
- Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता