• Download App
    Cyclone Yaas Effect Odisha: चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले 'यास' !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ' यास ' ?।Cyclone Yaas Effect Odisha: Baby born in cyclone named 'Yas'! 750 babies born!

    Cyclone Yaas Effect Odisha: चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले ‘यास’ !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ‘ यास ‘ ?

    चक्रीवादळ म्हण्टले की काळजात धस्स होत .या वादळाच्या अनेक भयावह आठवणी कायम स्मरणात राहतात .


    मात्र इथे जरा वेगळं आहे .तर या वादळाची पुर्व कल्पना असल्याने अनेक गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं .काहींची तर प्रसुती देखील त्या भयावह वादळा दरम्यान झाली .


    आता मातृत्व जगातली सर्वात सुंदर गोष्ट आणि ती विशेष आणि कायम स्मरणात रहावी यासाठी माता पिता काहीतरी नाविन्यपूर्ण नाव आपल्या बाळाला देतात .आता बहुतांशी नावं ही त्या त्या परिस्थिति प्रमाणे दिली जातात .


    असेच हटके नाव दिले आहे ‘त्या’दिवशी जन्मलेल्या बहुतांशी बाळांना .यासची अशीही आठवण.Cyclone Yaas Effect Odisha: Baby born in cyclone named ‘Yas’! 750 babies born!


    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर : सरकारी आकडेवारी नुसार ओरिसाच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळ जेव्हा घोंगावत होते त्या काळात ७५० नवे जीव जन्माला आले. अनेक पालकांनी आपल्या नवजात बालकाचे मग तो मुलगा असो की मुलगी, नाव ‘यास’ ठेवले असल्याचे समोर आले आहे. या चक्रीवादळाचे नाव ओमान मध्ये ठेवले गेले असून या फार्सी शब्दाचा अर्थ आहे मोगरा. इंग्रजी मध्ये याचा अर्थ जास्मीन असा आहे.



    यातील काही बाळे यास ओरिसा किनारपट्टीवर दाखल झाले असताना जन्माला आली तर काही बाळे बालासोर जिल्हात ५० किमी दक्षिणेस असलेल्या बहानया येथे वादळ जमिनीवर धडकले तेव्हा जन्माला आली असे समजते. अनेकांनी हे वादळ कायम लक्षात राहील म्हणून बाळाचे नाव यास ठेवल्याचे सांगितले.

    राज्य सरकारने वादळाचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते तेव्हाच त्यात ६५०० गर्भवती महिला आहेत हे लक्षात आले होते. अगदी दिवस भरत आलेल्या महिलांना डिलीव्हरी सेंटर व अन्य स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले होते. शेल्टर होम मध्ये काही बालके जन्माला आली. बालासोर जिल्ह्यात १६५ बालके जन्मली त्यातील ७९ मुले आहेत तर ८६ मुली आहेत.

    Cyclone Yaas Effect Odisha: Baby born in cyclone named ‘Yas’! 750 babies born!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र