• Download App
    Cyclone Tauktae : रूद्रावतार @गुजरात ; २३ वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली वादळ ; सूरत विमानताळ बंद।Cyclone Tauktae: Rudravatar @ Gujarat; Gujarat's strongest storm in 23 years; Surat airport closed

    Cyclone Tauktae : रूद्रावतार @गुजरात ; २३ वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली वादळ ; सूरत विमानतळ बंद

    सौराष्ट्रमध्ये तौक्तेचं केंद्र:हवामान विभागाच्या माहितीनुसार, सौराष्ट्रमध्ये तौक्ते चक्रीवादळाने आपलं केंद्र बनवलं आहे, जे उत्तरी पूर्वी दिवीपासून ९५ किलोमीटर आणि अमरेलीच्या दक्षिणेत आहे.


    ताशी १८५ किलोमीटर वेगाने तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. तोक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुमारे दोन तास चालली, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. Cyclone Tauktae: Rudravatar @ Gujarat; Gujarat’s strongest storm in 23 years; Surat airport closed


    वृत्तसंस्था

    सूरत : भीषण तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान १८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहात होते. महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईत आणखी 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

    मागील 23 वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

    हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ हे गुजरातमध्ये मागील 23 वर्षात धडक देणारं सर्वात शक्तिशाली वादळ आहे.

    तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गुजरातमधील दोन लाखाहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तर यादरम्यान दोन नावे किनाऱ्यापासून दूर अरब समुद्रात गेली, या दोन नावेवर 410 लोक अडकल्याची त्यांना नौदलाच्या तीन जहाजांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

    तौक्ते चक्रीवादळामुळे अमरेलीमध्ये मोठं नुकसान झालं आहे, अजूनपर्यंत वादळी वारे सुरु आहेत आणि पाऊसही सुरु आहे.

    आज सकाळपासून जामनगरात वादळी वारे, सूरत विमानताळही बंद

    चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळ हलवण्यात आलं. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 54 पथकं मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

    यूपी, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात दोन तासात पावसाची शक्यता

    येत्या दोन तासांत उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

    Cyclone Tauktae: Rudravatar @ Gujarat; Gujarat’s strongest storm in 23 years; Surat airport closed

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही