• Download App
    लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता Cyclone is Developed Near Lakshdip Island. Would create Strong wind's Near konkan Area With Heavy Rain

    लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता

    वृत्तसंस्था

    मुंबई : अरबी समुद्रात लक्षद्विप बेटाजवळ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम कोंकण किनारपट्टीवर होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. Cyclone is Developed Near Lakshdip Island. Would create Strong wind’s Near konkan Area With Heavy Rain

    चक्रीवादळाला तोक्ते असे नाव दिले आहे. वादळामुळे केरळ, तामिळनाडू तसेच कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत. तसेच पावसाची शक्यता आहे. यासोबतच वादळाची नेमकी दिशा कशी राहील ,हे अद्याप अनिश्चित आहे. सर्व यंत्रणानी सज्ज राहावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व बोटींना त्वरित बंदरात आणण्याचे काम कोस्टगार्ड तसेच कस्टम्स आणि पोलिस दलाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.



    जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच आपत्ती व्यवस्थापन मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍ता भडकवाड उपस्थित होते. या चक्रीवादळाची तीव्रता कमी असली तरी येणाऱ्या काळात त्याचे रूपांतर कसे होईल याबाबत निश्चित सांगणे अवघड आहे. त्यामुळे याबाबतची पूर्वतयारी करून यात कमी नुकसान होईल यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

    वादळाचा रोख पाकिस्तानच्या दिशेने

    चक्रीवादळाचा रोख पाकिस्तानातील कराची बंदराच्या दिशेने आहे. ते तेथे जाऊन थडकणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळून ते 15 ते 16 या तारखांना जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून गावोगावी धान्यपुरवठा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अत्यावश्यक सुविधा, औषधे, दवाखान्यामधील सध्या दाखल रुग्णांची सुरक्षितता, वीज पुरवठा आदी बाबींकडे सर्वांनी लक्ष द्यावे , अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

    Cyclone is Developed Near Lakshdip Island. Would create Strong wind’s Near konkan Area With Heavy Rain

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!