• Download App
    CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड।CYBER CRIME: Central government's Fake News Investigation Department also caught in cyber crime

    CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड

    PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला.  CYBER CRIME: Central government’s Fake News Investigation Department also caught in cyber crime


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : cyber crime च्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात .फेक बातम्यांच फॅक्ट छेक करून आपल्या पर्यंत सत्य पोहचवन्याचे काम पिआयबी ही सरकारी वृत्तसंस्था करते .डिजीटल क्रांतीच्या या काळात अफवांचं (Fake News) पेव सुटलंय. खोट्या गोष्टी खऱ्या करुन प्रसारित केल्या जात आहेत. यावरच लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारचा पिआयबी  हा विभाग फॅक्ट चेकिंगचं (Fact Check) काम करत असतो. मात्र, आता फसवणूक करणाऱ्यांनी या विभागालाही सोडलेलं नाही. सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला. मात्र, पीआयबीने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने याबाबत नागरिकांना माहिती देत सावध केलं आहे .

    PIBFactCheck ने याबाबत ट्विट करत सांगितलं, “काही लोकांनी http://pibfactcheck.in” नावाची वेबसाईट बनवलीय. त्यांच्याकडून ही वेबसाईट पीआयबी फॅक्ट चेकची अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आलाय.” हे सांगतानाच पीआयबीने लोकांना या वेबसाईटच्या प्रभावात न येण्याचं आवाहन केलंय.



    “केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही खोट्या माहितीची किंवा अफवांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ट्विटरवर @PIBFactCheck ला फॉलोव करु शकता. तसेच https://pib.gov.in/factcheck.aspx या वेबसाईटला भेट देऊ शकता,” असंही पीआयबीने नमूद केलं. इतकंच नाही यावेळी पीआयबी फसवणूक करणाऱ्या वेबसाईटची एक यादीच जाहीर केली.

    फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स

    1. http://centralexcisegov.in/aboutus.php
    2. https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/
    3. https://kusmyojna.in/landing/
    4. https://www.kvms.org.in/
    5. https://www.sajks.com/about-us.php
    6. https://register-form-free-tablet.blogspot.com/

    या बनावट वेबसाईटवर पीआयबीच्या माहितीचा उपयोग करुनच अनेक बातम्या करण्यात आलेल्या आहेत. या वेबसाईटवर ही वेबसाईट एका ऑनलाईन मीडिया हाऊसची असल्याचं म्हटलंय. त्यांनी त्याबाबत सविस्तर लिहिलं आहे. संपादकाचं नाव प्रवीण असं देण्यात आलंय.

    CYBER CRIME : Central government’s Fake News Investigation Department also caught in cyber crime

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची