• Download App
    राहुल गांधींना आग्रह करत सुरू झालेली बैठक लोकशाही वाचविण्याचा आवाज देऊन संपली!! CWC Meeting rahul gandhi 

    CWC Meeting : राहुल गांधींना आग्रह करत सुरू झालेली बैठक लोकशाही वाचविण्याचा आवाज देऊन संपली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेली कार्यकारिणीची बैठक राहुल गांधींना आग्रह करण्यापासून सुरू झाली आणि लोकशाहीला वाचविण्याचा आवाज देऊन संपली…!! CWC Meeting rahul gandhi

    काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी अनेक वरिष्ठ नेते दिल्लीत आले होते. राहुल गांधींना पूर्णवेळ अध्यक्ष करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आग्रह धरला. त्याला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी दुजोरा दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे पूर्णवेळ अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह केला.

    – मुकुल वासनिक यांचे नाव फेटाळले

    बैठकीमध्ये जी 23 गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवल्याच्या बातम्या आल्या. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीने मुकुल वासनिक यांचे नाव फेटाळून लावले. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत नेमके काय झाले हे कोणत्याही अधिकृत सूत्रांनी काहीही स्पष्ट केले नाही.

    काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपताना काँग्रेस पक्षाचा अधिकृत ट्विटर हँडलवर संपूर्ण देशाला बरोबर घेऊन आपण लोकशाही वाचवू या, अशा आशयाचे ट्विट करण्यात आले. अर्थातच राहुल गांधींना पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी आग्रह करण्यावर सुरु झालेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक देशातील जनतेला बरोबर घेऊन लोकशाही वाचविण्याचा आवाज देऊन संपली…!!

    – पराभवाची जबाबदारी कोणावर?

    काँग्रेसचा पाच राज्यांमध्ये नेमका पराभव का झाला? या प्रत्येक राज्यांमध्ये नेमकी कोणाकडे जबाबदारी होती? त्यांनी आपल्या जबाबदारीचे कसे निर्वहन केले?, या विषयी कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली अथवा नाही हे काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले नाही.

    – प्रियांका गांधी उत्तर प्रदेश

    उत्तर प्रदेशाची जबाबदारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर होती. पंजाबची जबाबदारी अजय माकन यांच्यावर होती. उत्तराखंडची जबाबदारी हरीश रावत यांच्यावर होती. मात्र, या नेत्यांनी आपापल्या राज्यातील पराभवाचे रिपोर्टिंग काँग्रेस अध्यक्षांना केले की नाही, या विषयी देखील पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी माहिती दिली नाही आणि काँग्रेसच्या कायमच्या अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांना आग्रह करून सुरू झालेली बैठक देशातील जनतेला बरोबर घेऊन लोकशाही वाचविण्याचा आवाज देत संपली.

    CWC Meeting rahul gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी कोलंबियातील कॉफी शॉपचा व्हिडिओ शेअर केला; म्हणाले- तिथे कॉफी एक पीक नाही, तर त्यांची ओळख

    PM मोदी म्हणाले- भारताला एकेकाळी 2G साठी संघर्ष करावा लागला; आज सर्व जिल्ह्यांत 5G कनेक्टिव्हिटी

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात “महायुती” झाल्याची अतिउत्साही लिबरल माध्यमांची अफवा; प्रत्यक्षात घडलय काय घडलंय??, ते वाचा!!