विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण प्रत्येकी ६०० पेक्षा कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. Curfew in UP removed
राज्यात बुधवारपासून (ता.९) सकाळी सात ते संध्याकाळी सातदरम्यान संचारबंदी शिथील केली जाईल. मात्र, सर्व जिल्ह्यांत संध्याकाळी सात ते सकाळी सातदरम्यान तसेच शनिवार-रविवारी संचारबंदी कायम असेल. उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांत कोरोना संसर्ग कमालीचा घटत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात केवळ ७९७ नवीन रुग्ण आढळले.
सध्या राज्यात कोरोनाचे १४ हजार सक्रिय रुग्ण आहेत. सर्वच जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय रुग्ण ६०० पेक्षा कमी झाले आहेत. राज्यात सोमवारी कोरोनाच्या दोन लाख ८५ हजार चाचण्या करण्यात आल्या. पॉझिटिव्हिटी दर अवघा ०.२ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के आहे.
Curfew in UP removed
महत्त्वाच्या बातम्या