• Download App
    राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग : द्रौपद्री मुर्मूंच्या विजयातील फरक वाढणार, संसदेत ९९.१८% मतदान|Cross Voting in Presidential Election Draupdri Murmu's margin of victory will widen, 99.18% voting in Parliament

    राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग : द्रौपद्री मुर्मूंच्या विजयातील फरक वाढणार, संसदेत ९९.१८% मतदान

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी मतदान झाले. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. निवडणूक आयोगानुसार, ७७१ खासदारांनी (५ जागा रिक्त) आणि ४,०२५ आमदारांनी (६ जागा रिक्त, २ अपात्र) ९९.१८% मतदान केले. एकूण ४,७९६ खासदार-आमदारांनी हक्क बजावला.Cross Voting in Presidential Election Draupdri Murmu’s margin of victory will widen, 99.18% voting in Parliament

    १० राज्ये आणि केंद्रशासित पुद्दुचेरीत १००% मतदान झाले. ८ खासदारांनी मतदान केले नाही. नवे राष्ट्रपती २५ जुलैला शपथ घेतील. निवडणुकीत तीन राज्यांत क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे. अनेक बिगर एनडीए पक्षांची साथ मिळाल्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे मुर्मूंना ६१% अधिक मते मिळू शकतात.



    कुठे झाले १०० टक्के मतदान?

    गुजरात, मध्य प्रदेश, छग, हिमाचल, केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, मणिपूर, पुद्दुचेरी, सिक्कीम.

    उपराष्ट्रपतिपदासाठी धनखड यांना ४६७ खासदारांची मते मिळतील

    एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभा सदस्य मिळून करतात. दोन्ही सभागृहांच्या ७८० सदस्यांत भाजपचे ३९४ खासदार आहेत. बहुमतासाठी ३९१ मते आवश्यक आहेत. प्रत्येकी २१ खासदार असलेल्या जद (यू)व बीजद तसेच ३१ खासदारांच्या वायएसआर काँग्रेसनेही धनखड यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे धनखड यांना ४६७ खासदारांची मते मिळू शकतात. धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांच्यासहित एनडीए नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मोदी म्हणाले, ‘धनखड उत्कृष्ट आणि प्रेरणा देणारे उपराष्ट्रपती ठरतील असा मला विश्वास आहे.’

    धनखड म्हणाले, ‘मी लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेन.’ उपराष्ट्रपतिपदासाठी ६ ऑगस्टला निवडणूक होईल. विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

    या आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग

    मध्य प्रदेशात सचिन बिर्ला-काँग्रेस, गुजरातेत कांधल जडेजा- एनसीपी, गुजरातेत छोटूभाई वसावा-बीटीपी, उत्तर प्रदेशात शिवपाल यादव-सपा, शिअदचे आमदार मनप्रीत अयाली यांचा बहिष्कार.

    या 8 खासदारांचे मतदान नाही

    सनी देओल भाजप, संजय धोत्रे भाजप, अतुल सिंह बसपा, गजानन कीर्तिकर शिवसेना, मो. सादिक काँग्रेस, शफिक रहमान बर्क सपा, इम्तियाज जलील एमआयएम, टीआर पारिवेंधर द्रमुक, कोरोना पॉझिटिव्ह सीतारमण पीपीई किट घालून आल्या होत्या. तर आजारी मुलायमसिंह यादव व्हीलचेअरवर संसदेत आले होते. तसेच व्हीलचेअरवर आलेले माजी पीएम मनमोहन सिंग यांनीही संसदेत मतदान केले.

    Cross Voting in Presidential Election Draupdri Murmu’s margin of victory will widen, 99.18% voting in Parliament

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र