• Download App
    नवी मुंबईमध्ये दारडीचे संकट कायम, दगड खाण कामामुळे डोंगर खिळखिळे ; पायथ्याखालील ६० हजार घरांना धोका। Crisis Slums near hill places Navi Mumbai, stone quarrying continues Danger to 60,000 houses under foot

    नवी मुंबईमध्ये दारडीचे संकट कायम, दगड खाण कामामुळे डोंगर खिळखिळे ; पायथ्याखालील ६० हजार घरांना धोका

    वृत्तसंस्था

    नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने सुमारे २०० लोकांचे जीव गेले. नवी मुंबईत असाच धोका आहे. शहराच्या पूर्वेला असलेली डोंगररांग दगडखाणीने पोखरल्याने सुमारे ६० हजार कुटुंबांचे जीव टांगणीला लागले आहेत. Crisis Slums near hill places Navi Mumbai, stone quarrying continues Danger to 60,000 houses under foot

    मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरीमध्ये डोंगराचे भूस्खलन झाल्याने निष्पाप लोकांचे नुकतेच जीव गेले होते. डोंगराखाली वसलेल्या गावांवर दरड पडल्याने गावच्यागावं नामशेष झाली. मुंबईतही अशाच लोकांचा नाहक जीव गेला. अशीच परिस्थिती नवी मुंबई शहरात आहे.
    नवी मुंबईच्या पूर्वेस असलेल्या २५-३० किलोमीटरवरील डोंगररांगाच्या पायथ्याशी हजारो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. ६० हजार गरीब परिवार झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. जोरदार पाऊस सुरू झाल्यावर झोप येत नसल्याचे येथील लोक सांगतात. कधी डोंगर कोसळेल आणि आमचा जीव जाईल, याची शाश्वती नाही.



    महापालिका झोपडपट्टी पुर्नविकास योजना लागू करत नसल्याने डोंगराचा सहारा घ्यावा लागत आहे, असे येथील लोक सांगतात.नवी मुंबईतील पारसिक हिल डोंगर रांगांचे अस्तित्व दगडखाणीने नष्ट करत आणले. संपूर्ण डोंगर पोखरले आहेत. दगडखाणींमुळे मोठ्या प्रमाणात डोंगरांचे नुकसान झाल्याने याचा परिणाम भूस्खलनावर होऊन जीवितहानी होऊ शकते. यामुळे अशा ठिकाणी महानगरपालिकेने झोपडपट्टी न वसवता झाडे लावून डोंगरांची निगा राखावी, अशी मागणी पर्यावरण तज्ञांकडून होत आहे.

    नवी मुंबईत १ लाखाच्या वर झोपडपट्यांची संख्या वाढिला महापालिका कारणीभूत आहे.  झोपडपट्टी धारकांसाठी एसआरए योजना लागू केली जात नसल्याने  गरीब लोकांना डोंगराखाली जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली असल्याचा आरोप समाजसेवकांनी केला.

    Crisis Slums near hill places Navi Mumbai, stone quarrying continues Danger to 60,000 houses under foot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट