• Download App
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना जावेद अख्तरना भोवली; दिल्ली-मुंबईत फौजदारी गुन्हे दाखल|Criminal Complaint Filed Against Javed Akhtar For Linking RSS To Taliban

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना जावेद अख्तरना भोवली; दिल्ली-मुंबईत फौजदारी गुन्हे दाखल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली / मुंबई : बॉलीवूडचे पटकथाकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना अफगाणिस्तानच्या तालिबानशी केल्यानंतर त्यांच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत दोन वकिलांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.Criminal Complaint Filed Against Javed Akhtar For Linking RSS To Taliban

    दिल्लीत संतोष दुबे या वकिलांनी त्यांना सात दिवसांची नोटीस पाठवली असून जावेद अख्तर यांनी संघाची तुलना तालिबानशी केल्याबद्दल संघाची माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस त्यांनी दिली आहे.



    मुंबईत धृतिमान जोशी या वकिलाने भारतीय फौजदारी कायदा कलम 499 आणि 500 यानुसार कुर्ला पोलीस स्टेशन मध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून जावेद अख्तर यांनी हिंदू समाजाची बदनामी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक तालिबानशी तुलना करणारे विधान केले आहे, असा आरोप केला आहे.

    आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री, मंत्री, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या घटनात्मक पदांवर काम करत आहेत. आपापल्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनुसार पार पाडत आहेत, अशा स्थितीत त्यांची मातृसंस्था संघ ही तालिबानशी वैचारिक जवळीक साधून आहे असे जावेद अख्तर कसे काय म्हणू शकतात?, असा परखड सवाल धृतिमान जोशी यांनी विचारला आहे.

    जावेद अख्तर यांची टीका करण्याची विशिष्ट पद्धत आहे. बेछूट टीका करायची आणि पळ काढायचा हीच त्यांची मनोवृत्ती आहे, अशी टीका देखील धृतिमान जोशी यांनी केली आहे. परंतु आता त्यांना ओळखता येणार नाही. हिंदू समाजाची आणि संघाची बदनामी केल्याचा जाब द्यावाच लागेल अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही धृतिमान जोशी यांनी दिला आहे.

    Criminal Complaint Filed Against Javed Akhtar For Linking RSS To Taliban

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य