विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्यासह विनोद गोयंका, विकास ओबेराय यांच्यासह संगमसिटी टाऊनशीप प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सिद्धार्थ राजेंद्र मयूर यांच्यावर जमिनीच्याब खरेदीखतामध्ये खोट्या नोंदी करून तसेच खोट्या चतु:सीमा नमूद करून दिशाभूल करून खरेदीखताची नोंदणी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवेली सब रजिस्टर ऑफिसकडून यासंदर्भात फिर्याद देण्यात आली आहे.Crimes against 15 persons including builders Avinash Bhosale, Vinod Goenka and Vikas Oberoi
अविनाश निवृत्ती भोसले (रा. एबीएस पॅलेस, लॉरी इस्टेट, बाणेर रोड), विनोद के गोयंका (कर्मयोग, जुहू, मुंबई), विकास रणवीर ओबेराय (एन. एस. रोड, जुहू, मुंबई), सपना अभय जैन, कल्पना प्रमोद रायसोनी यांच्यासह सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, रूपाली नितीन निकम, निलेश निवृत्ती निकम, देवकी नीलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी, विकास विठ्ठलराव पवार, ज्योती राजेंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सह दुय्यम निबंधक एल. एम. संगावार (वय 41, रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल. एम. संगावार हे दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 8 या ठिकाणी 2019 पासून नेमणुकीस आहेत. त्यांच्या कार्यालयाकडे चेतन काळूराम निकम यांनी 2015, 2016 आणि 2019 या वर्षांमध्ये चार तक्रार अर्ज दिले होते. दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 8 याठिकाणी नोंदविण्यात आलेल्या सात दस्ताबाबत त्यांनी तक्रार केली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सुरू केली होती. या चौकशीमध्ये पक्षकारांनी भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या पक्षकारांना विरुद्ध तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, संगमवाडी येथील जमिनीच्या खरेदी खताच्या नोंदणी दरम्यान चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या. दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आले.
यासोबतच काही खरेदी खतांमधील सिटीएस क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठना दादाभाई अरदेसर सेठणा यांच्या जमिनीच्या देखील चुकीच्या नोंदी केल्या.
तसेच एका खरेदी खतामध्ये खोट्या आराखड्याचा नकाशाचे पान जोडले. यासोबतच चूक दुरुस्ती दस्त नोंदणी करताना तक्रारदार यांची जमीन कल्पना रायसोनी यांची असल्याचे खोटे नमूद करण्यात आल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. एका खरेदीखताच्या इंडेक्स 2 मध्ये देखील चुकीचा नोंदी करण्यात आलेले आहेत.
जमीन बळकावण्याचा हेतूने तसेच खरेदी खतामध्ये चुकीच्या आणि खोट्या चतुर्सिमा तसेच खोटे सीटीएस क्रमांक नमूद करून पक्षकारांनी नोंदणी अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crimes against 15 persons including builders Avinash Bhosale, Vinod Goenka and Vikas Oberoi
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान प्रकणावर रविना टंडन संतापल्या , दिली ‘ही ‘ प्रतिक्रिया
- एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार
- NCB अधिकाऱ्याने रेल्वेत काढली विद्यार्थिनीची छेड , पोलिसांनी केली अटक
- काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर यादीत कन्हैया कुमार, सचिन पायलटसह जी 23 मधील आनंद शर्मांचाही समावेश