• Download App
    एनआयएने केले नाट्यरूपांतर, वाझेची काढली कळवा ते सीएसटी लोकलवारी|Crime scene recreated by NIA, Wazes journey from CST to Kalva

    एनआयएने केले नाट्यरूपांतर, वाझेची काढली कळवा ते सीएसटी लोकलवारी

    मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आता जवळपास यशस्वी झाली आहे. हत्येच्या दिवशी ४ मार्चच्या रात्रीचा सर्व घटनाक्रमाचा त्यांनी उलगडा केला आहे. त मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेची सीएसएमटी ते कळवा लोकलवारी घडविली. सीआययूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या त्याच्या गुन्ह्याच्या कृत्याचे नाट्यरूपांतर (क्राइम सीन रिक्रिएट) करण्यात आले.Crime scene recreated by NIA, Wazes journey from CST to Kalva


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आता जवळपास यशस्वी झाली आहे. हत्येच्या दिवशी ४ मार्चच्या रात्रीचा सर्व घटनाक्रमाचा त्यांनी उलगडा केला आहे.

    त मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेची सीएसएमटी ते कळवा लोकलवारी घडविली. सीआययूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या त्याच्या गुन्ह्याच्या कृत्याचे नाट्यरूपांतर (क्राइम सीन रिक्रिएट) करण्यात आले.



    रात्री सव्वाअकरा ते दोन वाजेपर्यंत त्याची कारवाई सुरू होती. तपास पथकासमवेत पुण्यातील ‘सीएफएसएल’चे तंत्रज्ञांचे पथकही सोबत होते.ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या करण्यात आली होती.

    त्यासाठी वाझे हा आपला कार्यालयीन वापरातील मोबाइल सीआययू कार्यालयात ठेवून सीएसएमटीपर्यंत चालत गेला. तेथून कळवा येथे ताे लोकलने गेला. हा सर्व घटनाक्रम तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्याकडून करून घेतला.
    सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये

    एका फुटेजमध्ये ४ मार्चला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वाझे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेने चालत जाताना दिसला. ओळख पटू नये यासाठी त्याने मुद्दाम गर्दीच्या वेळी लोकलमधून जाण्याचे ठरविले. तपास यंत्रणांना भरकटविण्यासाठी आपला मोबाइल सीआययूच्या कार्यालयातच ठेवला होता.

    ठाणे स्थानकावर आठच्या सुमारास ताे पोहोचला. त्याने आपला सहकारी शिंदे याला तावडे या नावाने हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलाविण्यास सांगितले. तेथून शिंदे व गोरेसाेबत गाडीतून जाऊन हिरेनचा मृतदेह खाडीत टाकल्यानंतर तो परत मुंबईत गेला. डोंगरीत बारवर छापा टाकण्याचा कारवाईत असल्याचा बनाव केला. एका सहकाऱ्याला कार्यालयातून आपला मोबाइल घेऊन येण्यास सांगितले होते.

    सीएसएमटी स्थानकावर सचिन वाझेचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. त्याचा दर्जा अत्यंत खराब आहे. त्यामुळे सोमवारी रात्री त्याला पुन्हा त्याच वेशातून तेथे चालविण्यात आले. त्याच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पहिल्या फुटेजचे साधर्म्य असल्याचे स्पष्ट केले जाणार आहे.

    Crime scene recreated by NIA, Wazes journey from CST to Kalva

    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक