वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये भाजपची राजकीय विकेट माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया राखणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियाने भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसच्या २ आमदारांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. Cricketer Dinesh Mongia entered BJP, two congress MLAs also joined BJP in Punjab
४४ वर्षीय दिनेश मोंगियाने डावखरा फलंदाज – फिरकी गोलंदाज आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनेश मोंगियाने भाजपा प्रवेश करुन राजकीय विकेटवर पाऊल ठेवले आहे. विद्यमान काँग्रेस आमदार फतेह सिंग बाजवा आणि बदविंदर सिंग लड्डी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांनी नुकतीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी भाजपशी युती करुन निवडणूक लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर काँग्रेस आमदारांचा आणि माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया यांचा भाजपा प्रवेश महत्त्वाचा ठरला आहे. या भाजपा प्रवेशावर बोलताना भाजपा गजेंद्र सिंग शेखावत म्हणाले, की आम्ही या नव्या नेत्यांचे पक्षात स्वागत करतो. यामुळे भाजपाची पंजाबमधील ताकद वाढली आहे.
भाजपाचे पंजाबमधील अस्तित्व कायमच दुय्यम होते. शिरोमणी अकाली दलासोबतची युती असताना भाजपा दुसऱ्या क्रमांकावरच होती. त्यामुळेच पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पंजाबमधील प्रसिद्ध चेहरे पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Cricketer Dinesh Mongia entered BJP, two congress MLAs also joined BJP in Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- Modi In Punjab : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंजाबला भेट देणार पीएम मोदी, 5 जानेवारीला पीजीआय सॅटेलाइट सेंटरची पायाभरणी
- टायगर खतरे में है : महाराष्ट्रात ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ६५ जणांनी गमावले प्राण
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती तर ठाकरे सरकार पडले असते, नाना पटोले यांचे वक्तव्य