वृत्तसंस्था
पणजी : गोव्यामध्ये सध्या तिहेरी मोहीम सुरू आहे राजकीय मोहिमेत काँग्रेसच्या आठ आमदारांनी आपला पक्ष त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने ड्रग्स पेडलर्स आणि नाईट पार्टीज वर जोरदार क्रॅक डाऊन केला आहे. ही मोहीम येत्या काही दिवसात वेग पकडणार असून त्यात आता गोवा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 17 सप्टेंबर रोजी गोव्यातल्या 37 बीचेस वर “क्लीन कोस्ट सेफ सी” अशी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाबरोबरच गोवा सरकार तसेच गोव्यातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. Crackdown on drug peddlers in Goa
गोव्यामध्ये भाजपचे सरकार पुन्हा आल्यानंतर ड्रग्स पेडलर्स वर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. नाईट पार्टीज वर पोलिसांनी अनेक ठिकाणी कठोर कायदेशीर कारवाया केल्या आहेत. या कारवाया थांबणार तर नाहीतच, उलट आता गोव्यामध्ये पर्यटकांना अधिकाधिक सुरक्षित वाटावे आणि त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी गोव्यातल्या 37 बीचेस वर “क्लीन कोस्ट आणि सेफ सी” अशी मोहीम असे घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोव्यातला पर्यटन व्यवसाय म्हणजे केवळ नाईट पार्टीज एवढा पुरता मर्यादित नाही, तर गोव्यात हेरिटेज वास्तू, मंदिरे, किल्ले समुद्रकिनारे यांची रेलचेल असताना त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी दिली आहे.
गोव्याची प्रतिमा बॉलिवूड आणि अन्य चित्रपटांमध्ये नाईट पार्टीज किंवा केवळ चर्चेस आणि न्यूड बीचेस अशीच रंगवण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेत आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून ड्रग्स पेडलर्सवर कायद्याचा कुठाराघात, नाईट पार्टीज वर कायदेशीर कारवाई आणि आता समुद्रकिराणांच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सफाईसाठी “क्लीन कोस्ट सेफ सी” ही मोहीम सुरू केली जाणार आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केरळ आणि तामिळनाडू मधून जरी भारत जोडो यात्रा सुरू केली असली, तरी गोव्यातून मात्र देशभरात आता काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे, असा टोला डॉ. सावंत यांनी लगावला आहे.
Crackdown on drug peddlers in Goa
महत्वाच्या बातम्या
- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!
- ईडीची धडक कारवाई : मुंबईतल्या झवेरी बाजारातून तब्बल 92 किलो सोन्यासह 330 किलो चांदी जप्त!
- मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!
- सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!