• Download App
    नास्तिक CPIचा प्रभू श्रीरामांना लाल सलाम : कम्युनिस्टांचे रामायणावर वर्ग; राइट विंग आणि संघाला आव्हान देण्याची तयारी । CPI Ramayana And Indian Heritage Programme, to challange RSS and Right Wing In Kerala

    नास्तिक CPIचा प्रभू श्रीरामांना लाल सलाम : कम्युनिस्टांचे रामायणावर वर्ग; राइट विंग आणि संघाला आव्हान देण्याची तयारी

    CPI Ramayana And Indian Heritage Programme : बऱ्याच काळापासून भारतीय राजकारण प्रभु श्रीरामाभोवती फिरत आहे. सर्वच पक्ष श्रीरामाच्या नावाने सश्रद्ध जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानेसुद्धा (सीपीआय) श्रीरामांनाच शरण जाण्याचे ठरवलेले दिसते. केरळमध्ये पक्षाच्या मलप्पुरम जिल्हा समितीने रामायणावर ऑनलाइन टॉक सिरीज सुरू केली आहे. राइट विंग आणि संघ परिवार (आरएसएस) विरुद्ध राजकीय युद्धात कम्युनिस्टांचा हा एक नवीन प्रभावी उपाय असल्याचे मानले जात आहे. CPI Ramayana And Indian Heritage Programme, to challange RSS and Right Wing In Kerala


    विशेष प्रतिनिधी

    तिरुवनंतपुरम : बऱ्याच काळापासून भारतीय राजकारण प्रभु श्रीरामाभोवती फिरत आहे. सर्वच पक्ष श्रीरामाच्या नावाने सश्रद्ध जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानेसुद्धा (सीपीआय) श्रीरामांनाच शरण जाण्याचे ठरवलेले दिसते. केरळमध्ये पक्षाच्या मलप्पुरम जिल्हा समितीने रामायणावर ऑनलाइन टॉक सिरीज सुरू केली आहे. राइट विंग आणि संघ परिवार (आरएसएस) विरुद्ध राजकीय युद्धात कम्युनिस्टांचा हा एक नवीन प्रभावी उपाय असल्याचे मानले जात आहे.

    ऑनलाइन टॉक शो

    ‘टीओआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सीपीआय मलप्पुरमच्या जिल्हा समितीने आपल्या फेसबुक पेजवर 7 दिवसांचा ऑनलाइन टॉक शो सुरू केला आहे. यामध्ये पक्षाचे राज्यस्तरीय नेतेही रामायण आणि श्रीरामावर भरभरून बोलत आहेत. ‘रामायण आणि भारतीय वारसा’ असे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. 25 जुलै रोजी सुरू झालेल्या या टॉक शोचा आज शेवटचा दिवस आहे.

    रामायण देशाच्या परंपरेचा अविभाज्य भाग

    सीपीआय मलप्पुरमचे जिल्हा सचिव पी. के. कृष्णदास म्हणाले की, सध्या जातीय आणि फॅसिस्ट शक्ती हिंदुत्वाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर दावा करतात. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात समाज आणि इतर राजकीय पक्ष त्यापासून दूर जात आहेत. रामायणासारखी महाकाव्ये आपल्या देशाच्या परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. टॉक शोच्या माध्यमातून पक्षाने पुरोगामी युगात रामायण कसे वाचावे आणि समजून घ्यावे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    संघाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

    रामायणाच्या समकालीन राजकारणावर बोलताना सीपीआयचे केशवन नायर म्हणाले की, रामायण काळातील राजकारण संघ परिवार जे करत आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. ते म्हणाले की, विरोधाभासी शक्तींचे वाहक म्हणून भगवान रामाचे चित्रण केले आहे. कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत ही रामायणाच्या सखोल अभ्यासानंतर कम्युनिस्टांच्या मनात येणारी पहिली गोष्ट आहे.

    CPI Ramayana And Indian Heritage Programme, to challange RSS and Right Wing In Kerala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!