• Download App
    FACT CHECK : CoWIN पोर्टल हॅक, 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचे सत्य । COWIN App Hacked message is fake, no data leak says central Government Read Fact Check

    FACT CHECK : CoWIN पोर्टल हॅक, 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचे सत्य

    FACT CHECK : कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज व्हायरल झालेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून यात कोरोना लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी वापरले जाणारा कोविन अॅप हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून 15 कोटी भारतीय नागरिकांचा डेटा लीक झाल्याचे म्हटले आहे. तथापि, केंद्र सरकारने हा दावा फेटाळला असून तो मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे. COWIN App Hacked message is fake, no data leak says central Government Read Fact Check


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज व्हायरल झालेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून यात कोरोना लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी वापरले जाणारा कोविन अॅप हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून 15 कोटी भारतीय नागरिकांचा डेटा लीक झाल्याचे म्हटले आहे. तथापि, केंद्र सरकारने हा दावा फेटाळला असून तो मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे.

    सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म डार्क ट्रेसरनेदेखील डेटा लीक मेसेजचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. लस घेतलेल्या 15 कोटी भारतीय नागरिकांचे नाव, मोबाइल नंबर, आधार कार्ड, जीपीएस लोकेशन, राज्य इत्यादी माहिती लीक झाल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

    या व्हायरल मेसेजवर उत्तर देताना केंद्र सरकारने म्हटले की, “प्रथमदर्शी हा रिपोर्ट फेक आहे. पोर्टलवर सर्व डेटा अगदी सुरक्षित सेव्ह केला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम याचा तपास करत आहे.”

    CoWIN चे चेअरमन डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले की, “कोविन अॅप हॅक झाल्याच्या व्हायरल मेसेजने आमचे लक्ष वेधले असून या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की, कोविनमध्ये लसीकरण डेटा अगदी सुरक्षित स्टोर करण्यात आला आहे. हा डेटा बाहेर शेअर करण्यात आलेला नाही. कोविन अॅपमधील युजर्सचे राहते ठिकाण लीक झाल्याचा या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु, कोविन अॅपद्वारे युजर्सची अशी कोणतेही माहिती जतन केली जात नाही.”

    COWIN App Hacked message is fake, no data leak says central Government Read Fact Check

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य