• Download App
    गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊल ; पर्यटकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यकच Covid Negative Report Is Must For Goa Tourist : Goa Government Is Strict

    Goa Lockdown : गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊल ; पर्यटकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यकच

    वृत्तसंस्था

    गोवा : तुम्ही गोव्याला जाणार असला तर तुम्हाला कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र बरोबर ठेवावं लागणार आहे. अन्यथा प्रवेश करता येणार नाही, असे आदेश गोवा सरकारने काढले आहेत. मात्र, गोव्याचे रहिवासी तसा पुरावा देऊन राज्यात प्रवेश करू शकतात. Covid Negative Report Is Must For Goa Tourist : Goa Government Is Strict

    एखाद्या कामाकरता गोव्यात जात असाल तर त्या संबंधित कार्यालयाचे पत्र जवळ हवे. मेडिकल इमर्जन्सीमध्ये मात्र या प्रमाणपत्राची गरज नाही. रस्ते आणि रेल्वे मार्गाने गोव्यात जाताना हे नियम आहेत.

    मुंबई-गोवा महामार्गावरून पत्रादेवीमध्ये गोवा पोलिस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. तर कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे पाऊल उचलले आहे.



    रेल्वे प्रवाशांना चाचणी अहवालाचे बंधन

    रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत केलेला आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करायचा आहे. गोव्यातील रहिवासी असलेल्यांना वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे, गोव्याला कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे आणि गोव्यात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आवश्यकतेनुसार या नियमांमधून सूट आहे.

    Covid Negative Report Is Must For Goa Tourist : Goa Government Is Strict

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही