वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जवळजवळ पाकिस्तानचे भाषा वापरतात आहेत. बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स अर्थात बीएसएफला आवरा. राज्य कसे करायचे ते मला शिकवू नका, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्यात त्यांना धमकी देऊन टाकली आहे.Cover the BSF, don’t teach me
अमित शहा आज आणि उद्या दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. त्यांनी बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स बीएसएफच्या विविध केंद्रांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. बीएसएफच्या जवानांसमवेत यांनी आज दुपारी भोजन देखील घेतले. त्यानंतर त्यांनी सिलिगुडी मध्ये गोरखा संमेलनाला संबोधित केले.
या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत अमित शहा यांना उद्देशून धमकी भरली भाषा वापरली. ममता बॅनर्जी म्हणाल्या, की अमित शहा मला तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जिम्मेदारी तुमची आहे. पण तुम्ही बीएसएफला आवरा. त्यांना जास्त अधिकार देऊ नका. मला राज्य करायला शिकवू नका. बुलडोझर चालवून देशातल्या संघराज्य व्यवस्थेला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर शरसंधान साधले आहे.
बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स बीएसएफच्या कार्यकक्षेतचा दायरा सीमेच्या आतील भागात 15 किलोमीटर ऐवजी 50 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्याने ममता बॅनर्जी चिडल्या आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमावर्ती भागातून ड्रग्स, हत्यारे यांची तस्करी रोखण्यासाठी तसेच घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सच्या कार्यकक्षेत वाढ केली आहे. यातून अनेक ठिकाणी तस्करी आणि घुसखोरी प्रभावीरीत्या रोखली आहे. इतकेच काय पण भारतातून बांगलादेश आणि पाकिस्तानात होणाऱ्या बो तस्करीला देखील मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.
परंतु नेमकी हीच बाब ममता बॅनर्जी यांना खटकली आहे. राज्य सरकारच्या धिकार्यांमध्ये हस्तक्षेप असल्याचा त्यांनी आरोप केला आहे आणि त्यामुळेच अमित शहा हे बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी अत्यंत विखारी शब्दांवरील मला शिकवू नका. आगीशी खेळू नका, वगैरे शब्द उच्चारले आहेत. अमित शहा यांनी ममतांना अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. उद्याच्या दौऱ्यात अमित शहा त्यावर कोणते भाष्य करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Cover the BSF, don’t teach me
महत्वाच्या बातम्या