• Download App
    कोव्हॅक्सिन फेज ३ च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये ७७.८ टक्के प्रभावी|Covacin is 77.8% effective in Phase 3 clinical trials

    कोव्हॅक्सिन फेज ३ च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये ७७.८ टक्के प्रभावी

    हैद्राबादची कंपनी भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस असलेली  कोव्हॅक्सीन फेज-3 च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ट्रायलचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला सोपवला होता. ज्यावर मंगळवारी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लसीच्या तिसºया फेजच्या ट्रायलच्या डेटाला मंजूरी देण्यात आली.Covacin is 77.8% effective in Phase 3 clinical trials


    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : हैद्राबादची कंपनी भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस असलेली  कोव्हॅक्सीन फेज-3 च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ट्रायलचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला सोपवला होता. ज्यावर मंगळवारी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लसीच्या तिसऱ्या  फेजच्या ट्रायलच्या डेटाला मंजूरी देण्यात आली.

    कोव्हॅक्सिनची फेज -तीनची 25,800 लोकांवर  ट्रायल करण्यात आली होती. यामध्ये दिसून आले की, कोरोनाविरोधात  व्हॅक्सीन किती बचाव करते.  या डेटाला आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे सुपूर्द  केले जाऊ शकेल. कोव्हॅक्सीनला भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑ फ मेडिकल रिसर्चसोबत मिळून विकसित केले आहे.



    मार्चच्या सुरुवातीला भारत बायोटेकने फेज-3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला होता. प्राथमिक आकडेवारीनुसार सांगण्यात आले होते की, कोव्हॅक्सीन कोरोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी 81 टक्के  प्रभावी आहे. त्याच वेळी, ही लस गंभीर आजारापासून किंवा संसगार्नंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून 100 टक्के संरक्षण देते असेही सांगण्यात आले होते.

    यापूर्वी भारत बायोटेकचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट  जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारले होते. डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये महामारी सारख्या काळात सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासळी जाते. डब्ल्यूएचओच्या मते, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता शक्यत तितक्या लवकर औषधे, लस  विकसित करणे आणि त्यास मान्यता देणे आवश्यक आहे.

    Covacin is 77.8% effective in Phase 3 clinical trials

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!