विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या ६१७ या नव्या अवताराला रोखण्यामध्ये सक्षम असल्याचे आढळून आले आहे असे अमेरिकेने स्पश्ट केले आहे. भारतीय संशोधनावर ही एक प्रकारे मोहोर उमटली असल्याचे मानले जाते.Covaccine is best in world
व्हाईट हाउसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे साथरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी ही माहिती दिली. जगभरातील लशींचा डेटा आम्हाला मिळत असून भारताने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या ६१७ या उपप्रकाराला रोखत असल्याचे आढळून आले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हेच कोरोनाचे संसर्ग रोखणारे प्रभावशाली शस्त्र असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, फायझर आणि ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या लशी घेतल्यानंतर काहीजणांमध्ये सौम्य आणि अल्पकालीन असे साईडइफेक्ट दिसून आले आहेत.
या लशी घेतल्यानंतर अनेकांना काही काळ डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवला पण ही सगळी लक्षणे सामान्य असल्याचे लान्सेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये म्हटले आहे. ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनमधील संशोधक या संशोधनामध्ये सहभागी झाले होते.
Covaccine is best in world
महत्त्वाच्या बातम्या
- हवाई दलाचे कोव्हिड योद्धे सज्ज; अवजड वाहतुकीची विमाने २४ तास तत्पर
- कोरोनाविरुध्द लढण्याची ही जिद्द आपल्याला देईल प्रेरणा, लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात
- वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण , वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी अखेर गजाआड
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- प्रिन्स चार्ल्स यांची कृतज्ञता, म्हणाले भारताने संकटकाळात सर्वांची मदत केलीय आता आपले कर्तव्य