• Download App
    शर्जील इमामला न्यायालयाचा दिलासा नाहीच, दंगलप्रकरणी जामीन फेटाळला |Court rejects bail plea of Sharjil

    शर्जील इमामला न्यायालयाचा दिलासा नाहीच, दंगलप्रकरणी जामीन फेटाळला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – प्रक्षोभक भाषण करत २०१९ मध्ये हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.Court rejects bail plea of Sharjil

    अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुज अग्रवाल यांनी शर्जील इमामला जामीन नाकारताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदविली आहेत. या भाषणाच्या मसुद्यावर धावती नजर टाकली असता त्यातून जातीयवाद स्पष्टपणे दिसून येतो, असेही न्यायाधीशांनी नमूद केले.



    शर्जीलच्या भाषणानंतर बिथरलेल्या जमावाने तोडफोड करत पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला पुष्टी देणारे पुरावे सादर करा असे स्पष्ट निर्देश पोलिसांना दिले आहेत. मागील वर्षी ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणात देखील इमामला आरोपी करण्यात आले आहे. या दंगलीत ५३ लोक मरण पावले होते तर सातशेवर जखमी झाले होते.

    शर्जीलने केलेले भाषण हे जातीयावादी होते, समाजातील शांतता आणि सौहार्दावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ते करण्यात आल्याचे दिसून येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले की, शर्जील इमामने १३ डिसेंबर २०१९ रोजी प्रक्षोभक भाषण दिल्यानंतर दोन दिवसांत राजधानीमध्ये हिंसाचार उसळला होता.

    Court rejects bail plea of Sharjil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!