तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं सीबीआयने सांगितलं आहे.
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण केसमध्ये, राऊस एव्हेन्यू न्यायालयाने CBI प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. यामुळे आता ते ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. तर, जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. Court extends Manish Sisodias judicial custody till April 3
मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणात, सीबीआयने म्हटले आहे की तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
मनीष सिसोदिया २२ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्या वकिलाने ईडीच्या रिमांडच्या वाढीच्या विनंतीला विरोध करत म्हटले होते की, तपास यंत्रणा कथित गुन्ह्याच्या उत्पन्नावर मौन बाळगून आहे, जे प्रकरणाच्या केंद्रस्थानी होते. कोठडी वाढवण्यात काही अर्थ नाही आणि सिसोदिया यांच्या आधीच्या सात दिवसांच्या कोठडीत फक्त चार लोकं त्यांच्यासमोर आणली गेली होती. असेही ते म्हणाले.
Court extends Manish Sisodias judicial custody till April 3
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
- महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!
- मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर