• Download App
    मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग|Country's first death due to monkeypox 22-year-old returned to Kerala from UAE, infected abroad

    मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्सचा धोका झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, शनिवारी केरळमधील त्रिशूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, हा तरुण 21 जुलै रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून परतला होता, त्यानंतर त्याला 27 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे पाच रुग्ण नोंदवले गेले आहेत.Country’s first death due to monkeypox 22-year-old returned to Kerala from UAE, infected abroad

    दरम्यान, यूएईमध्येच या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले होते. भारतात परतण्याच्या एक दिवस आधी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर लक्षणे दिसल्याने त्याने त्रिशूरमध्ये उपचार घेतले. आता सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यातही त्याला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



    उपचारात दिरंगाईची चौकशी होणार

    या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जॉर्ज यांचे म्हणणे आहे. मंकीपॉक्सने तरुणाच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागाने पुन्नूर येथे बैठकही बोलावली आहे. देशात परतल्यानंतर मृत तरुणाशी संपर्क झालेल्यांची यादी आणि रूट मॅप तयार करण्यात येत आहे.

    नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले

    पुण्यातील NIVमधून तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच मंकीपॉक्समुळे मृत्यूची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे. जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, तरुणाच्या कुटुंबीयांनी काल यूएईमध्ये केलेल्या तपासणीचा अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे.

    मंकीपॉक्समुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी

    जॉर्ज यांनी सांगितले की, मंकीपॉक्सच्या या प्रकारामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. वास्तविक, मंकीपॉक्स विषाणूचे दोन प्रकार आहेत – पहिला कॉंगो स्ट्रेन आणि दुसरा पश्चिम आफ्रिकन स्ट्रेन. सध्या जगभरात पसरलेला स्ट्रेन हा पश्चिम आफ्रिकन आहे, ज्याचा मृत्यू दर 1% आहे.

    Country’s first death due to monkeypox 22-year-old returned to Kerala from UAE, infected abroad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य